शहरं
Join us  
Trending Stories
1
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
2
Top Marathi News Live Updates: देशासमोरील संकट गंभीर, पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी- शरद पवार
3
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
4
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
5
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
6
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
7
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
8
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
9
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
10
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
11
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
12
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
13
VIDEO : असा दबा धरून शिकार करतात सिंह, गिर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडला अंगावर शहारा आणणारा थरार 
14
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
15
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
16
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
17
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
18
Video - हाहाकार! उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस अन् भीषण चक्रीवादळ; १०१ जणांचा मृत्यू
19
VIDEO: मुख्यमंत्री 'बुलेट'वरून विधानभवनात! PM मोदींचा आदर्श ठेवत फडणवीसांचाही कृतीतून संदेश
20
Motorola Razr Fold भारतात लॉन्च; १.७० लाखांचा फोन ५,५५६ रुपयांच्या EMI वर उपलब्ध
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय वाहनाच्या धडकेत महिला गंभीर जखमी

By admin | Updated: July 10, 2015 02:05 IST

अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वाहनाने मागून धडक दिल्याने एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी

अहेरी : अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वाहनाने मागून धडक दिल्याने एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास अहेरीच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाजवळ घडली. गिता गंगाराम कोडापे (३०) रा. अहेरी असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.
अहेरीचे माजी सरपंच गंगाराम कोडापे यांची मुलगी गिता कोडापे ही दुपारी २ वाजताच्या सुमारास सायकलने अहेरीकडून खमनचेरूकडे जात होती. दरम्यान एमएच ३३-४४०५ क्रमांकाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या मिनी ट्रकने तिला मागून जबर धडक दिली. यात ती गंभीर जखमी होऊन घटनास्थळी बेशुध्द झाली. सदर घटनेची माहिती कळताच नातेवाईकांनी घटनास्थळावर धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ सदर अपघातग्रस्त वाहन ताब्यात घेतले. अपघातातील मिनीट्रकचा चालक साईनाथ सडमेक हा दारूच्या नशेत वाहन चालवित असल्याचा आरोप जखमीच्या नातेवाईकांनी केला आहे. जखमी गिता कोडापे हिला अहेरीच्या उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला चंद्रपूरला हलविण्यात आले. या घटनेसंदर्भात अहेरी पोलिसांनी संबंधित वाहनचालकावर गुन्हा दाखल केला आहे. (शहर प्रतिनिधी)