महिला कर्मचाऱ्यांनी निर्भीडपणे परिस्थितीचा सामना करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:53 IST2021-02-05T08:53:37+5:302021-02-05T08:53:37+5:30

अहेरी : शासकीय सेवेत कर्तव्य बजावताना कोणत्याही आमिषाला व वरिष्ठांच्या दडपणाला बळी न पडता निर्भीडपणे परिस्थितीला सामोरे जावे व ...

Women employees should face the situation fearlessly | महिला कर्मचाऱ्यांनी निर्भीडपणे परिस्थितीचा सामना करावा

महिला कर्मचाऱ्यांनी निर्भीडपणे परिस्थितीचा सामना करावा

अहेरी : शासकीय सेवेत कर्तव्य बजावताना कोणत्याही आमिषाला व वरिष्ठांच्या दडपणाला बळी न पडता निर्भीडपणे परिस्थितीला सामोरे जावे व आपल्यासह अन्य महिला कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार करावा, असे प्रतिपादन प्रा. मंगला बनसोड यांनी केले. वनविकास महामंडळाच्या प्राणहिता विभागात विशाखा समिती स्थापन कार्यक्रमात त्या बाेलत हाेत्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहायक व्यवस्थापक डी.एस. चांदेकर होते. वक्ते म्हणून प्रा. मंगला बनसोड, डॉ. नागसेन मेश्राम, अंगणवाडी पर्यवेक्षिका सुशीला भगत तर प्रमुख अतिथी म्हणून अजिंक्य घाटेकर उपस्थित होते. सुशीला भगत यांनी महिलांनी समाजात वावरताना किंवा शासकीय कर्तव्य बजावताना आपल्याकडून कायद्याचा आधार घेऊन गैरवापर होणार नाही याची काळजी घ्यावी, असे सांगितले. डॉ. नागसेन मेश्राम यांनी महिलाविषयक कायदे आणि पुरुष व महिला कर्मचारी यांनी कर्तव्य बजावताना घ्यावयाची दक्षता याबाबत मार्गदर्शन केले. डी. एस. चांदेकर यांनी महिलाविषयक कायद्यांची गरज व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन पी.डी. वाकोडे तर आभार गणेश शिंदे यांनी मानले.

Web Title: Women employees should face the situation fearlessly