शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
6
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
7
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
8
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
9
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
10
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
11
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
12
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
13
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
14
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
15
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
16
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
17
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
18
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
19
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
20
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
Daily Top 2Weekly Top 5

बस आगारातील रेस्ट रूम सुविधांविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 06:00 IST

खोलीच्या दोन्ही बाजूला पाणी साचले आहे. या साचलेल्या पाण्यातूनच मार्ग काढत रेस्टरूमपर्यंत पोहोचावे लागते. रेस्टरूमचा परिसर कधीच झाडला जात नाही. त्यामुळे या परिसरात चिखल निर्माण झाले आहे. पावसाच्या पाण्यासोबत वाहत आलेल्या पाण्याच्या बॉटलचा खच पडला आहे. मागील महिनाभरापासून साचून असलेल्या पाण्यात कचरा कुजल्याने दुर्गंधी येत आहे.

ठळक मुद्देसाचलेल्या पाण्यातून काढावी लागते वाट : चिखलासोबत दुर्गंधी, गडचिरोली आगारातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वाहक व चालकांना काही काळ विश्रांती करता यावी, यासाठी गडचिरोली आगारात रेस्टरूम आहे. मात्र या रेस्टरूममध्ये कोणत्याही सुविधा नाही. विशेष म्हणजे पाणी व चिखल तुडवत रेस्टरूम गाठावी लागते.गडचिरोली आगारात शेकडो वाहक व चालक आहेत. पहिली बसफेरी नेऊन आणल्यानंतर दुसरी बसफेरीला अर्धा ते एक तास वेळ राहतो. कधीकधी दुसऱ्या मार्गावरील बसफेरी दिली जाते. याही बसफेरीला वेळ राहतो. मधल्या कालावधीत वाहक व चालकांना विश्रांती मिळावी, तसेच जेवण करता यावे, यासाठी एक स्वतंत्र खोली उपलब्ध करून दिली आहे. पूर्वी सदर खोली बसस्थानकाच्या अगदी समोर होती. बसस्थानकाचे काम सुरू झाल्यानंतर आता आगाराच्या आवारातील एक खोली उपलब्ध करून दिली आहे. मात्र या खोलीत सोयीसुविधांचा पूर्णपणे अभाव आहे.खोलीच्या दोन्ही बाजूला पाणी साचले आहे. या साचलेल्या पाण्यातूनच मार्ग काढत रेस्टरूमपर्यंत पोहोचावे लागते. रेस्टरूमचा परिसर कधीच झाडला जात नाही. त्यामुळे या परिसरात चिखल निर्माण झाले आहे. पावसाच्या पाण्यासोबत वाहत आलेल्या पाण्याच्या बॉटलचा खच पडला आहे. मागील महिनाभरापासून साचून असलेल्या पाण्यात कचरा कुजल्याने दुर्गंधी येत आहे. खिडक्या व मुख्य द्वाराच्या झडपा तुटल्या आहेत. टिनांच्या पत्र्यांमधून पावसाचे पाणी गळते. मागील अनेक वर्षांपासून रंगरंगोटी करण्यात आली नाही. त्यामुळे भिंतीवर चित्रविचित्र डाग पडले आहेत. या ठिकाणी दोन गाद्या आहेत. मात्र त्यांची अवस्था बघितल्यानंतर त्यांना गाद्या म्हणावे काय, असा प्रश्न उपस्थित होतो. एक बेड आहे, मात्र तोही मोडका आहे, एक पाय तुटला असल्याने तुटलेला पाय पेटीवर ठेवून आहे. अशा बेडवर चालक व वाहक खरोखरच झोपून आराम करत असतील काय, असा प्रश्न उपस्थित होते.वीजेअभावी पंखे बंद; रात्री राहते अंधारवीजेचे महत्त्व ओळखून देशातील एकही कुटुंब विजेपासून वंचित राहू नये, यासाठी गरीब कुटुंबाला केंद्र शासन मोफत वीज पुरवठा उपलब्ध करून देते. मात्र एसटीच्या रेस्टरूममध्ये वीजसुद्धा उपलब्ध नाही. परिणामी रात्री या रेस्टरूममध्ये अंधार राहतो. पंखे सुद्धा बंद आहेत. दोन एकराच्या परिसरात असलेल्या एसटी आगारात शेकडो वीज दिवे आहेत. विभागीय कार्यालय, बसस्थानक, आगार व्यवस्थापक कार्यालय या ठिकाणचे महिन्याचे वीज बिल ५० हजार रुपयांपेक्षा अधिक येते. त्यात एसटीची धुरा सांभाळणाऱ्या वाहक व चालकांसाठी एक लाईट सुद्धा एसटी व्यवस्थापन उपलब्ध करून देत नसल्याने वाहक व चालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.वाहक व चालकांना विश्रांती मिळावी, यासाठी रेस्टरूमची संकल्पना प्रत्येक आगारात आहे. मात्र गडचिरोली आगारातील रेस्टरूम बघितल्यानंतर या खोलीला रेस्टरूम म्हणावे काय, असा प्रश्न उपस्थित होते. सुविधा नसल्याने वाहक व चालक या ठिकाणी न थांबता. आगार परिसरातील झाडाखाली थांबतात.

टॅग्स :state transportएसटी