पत्नीचे मंगळसूत्र मोडले, तीन दिवसांपासून उपाशी.. मुख्यमंत्री साहेब माझ्या मुलाला वाचवा....

By संजय तिपाले | Updated: January 31, 2025 17:37 IST2025-01-31T17:35:37+5:302025-01-31T17:37:17+5:30

आदिवासी दाम्पत्याची व्यथा : मुलगा व्हेंटिलेटरवर, नागपूरमध्ये मृत्यूशी झुंज सुरु

Wife's mangalsutra broke, starving for three days.. Chief Minister, please save my son.... | पत्नीचे मंगळसूत्र मोडले, तीन दिवसांपासून उपाशी.. मुख्यमंत्री साहेब माझ्या मुलाला वाचवा....

Wife's mangalsutra broke, starving for three days.. Chief Minister, please save my son....

गडचिरोली : भामरागड तालुक्यातील एका आदिवासी युवकाला ताप आल्याचे निमित्त झाले अन् प्रकृती खालावली. नागपूरमध्ये एका खासगी दवाखान्यात भरती केले. पत्नीचे मंगळसूत्र मोडले,  व्याजाने घेऊन पैसे भरले, पण आणखी एक लाख भरा म्हणून सांगितले जाते. तीन दिवसांपासून पती- पत्नी उपाशी आहेत. हतबल झालेल्या पित्याने मुलाला वाचविण्यासाठी ३१ जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून साहेब, तुम्हीच आमचे पालक, माझ्या मुलाला वाचवा... अशी विनवणी केली आहे.

सुनील रमेश पुंगाटी (१७,रा. हितापाडी ता. भामरागड) असे त्या युवकाचे नाव. २५ जानेवारीला सुनील यास ताप आला,त्यानंतर त्याची प्रकृती खालावली. ताप डोक्यात गेल्याने आजारी पडलेल्या सुनीलला घेऊन पिता रमेश रामा पुंगाटी नागपूरला गेले. मुलाला एका खासगी दवाखान्यात भरती केले. आतापर्यंत एक लाख रुपये उपचार खर्च आला. मुलाला वाचविण्यासाठी पत्नीचे मंगळसूत्र मोडले व व्याजानेही पैसे घेतले, पण आणखी एक लाख रुपये जमा करा म्हणून दवाखाना प्रशासनाने सांगितले. पैसे नसल्याने तीन दिवसांपासून हे दाम्पत्य उपाशी आहे. 

अशा परिस्थितीत पैसे कोठून आणायचे, असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. निराश झालेल्या रमेश पुंगाटी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पालकमंत्री या नात्याने मुलाला वाचवा, अशी विनंती केली आहे.

मुलगा वाचेल की नाही माहीत नाही...
मुलगा व्हेंटिलेटरवर आहे, तो वाचेल की नाही माहीत नाही, अशा काळीज हेलावणाऱ्या शब्दांत रमेश पुंगाटी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. सध्या मुलावर उपचार सुरु असून आई- वडील त्याला वाचविण्यासाठी धडपडत आहेत.

दलालांचा सल्ला ऐकला, पण...
मुलाला घेऊन नागपूरमध्ये वणवण भटकत असताना काही दलालांनी या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला, तेथे स्वस्तात उपचार होतील, असे देखील सांगितले. प्रत्यक्षात कमी खर्चात उपचार होत नाहीत, असा उल्लेखही पत्रात करण्यात आला आहे.

Web Title: Wife's mangalsutra broke, starving for three days.. Chief Minister, please save my son....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.