शहरं
Join us  
Trending Stories
1
डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
5
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
6
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
7
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
8
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
9
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
11
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
12
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
13
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
14
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
15
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
16
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
17
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
18
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
19
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
20
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
Daily Top 2Weekly Top 5

वाय-फाय गायब, प्रथमोपचार पेट्याही रिकाम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:49 IST

एसटीला मिळत होते उत्पन्न वाय-फायची सुविधा पुरविण्याबाबतचा करार एसटी महामंडळ आणि वुट या कंपनीत २०१७ मध्ये झाला होता. ज्या ...

एसटीला मिळत होते उत्पन्न

वाय-फायची सुविधा पुरविण्याबाबतचा करार एसटी महामंडळ आणि वुट या कंपनीत २०१७ मध्ये झाला होता. ज्या कंपनीकडे होता त्या कंपनीला सदर सेवेच्या बदल्यात जाहीराती मिळतील अशी अपेक्षा होती. त्या उत्पन्नाचा वाटा एसटीलाही मिळणार होता. पण अपेक्षित नफा मिळत नसल्यामुळे सदर सेवा पुरवणाऱ्या कंपनीनेच त्याकडे लक्ष दिले नसल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली.

प्रथमोपचार किटचा तुटवडा?

वर्षातून एक वेळ एसटी महामंडळाच्या सर्व बसेस आरटीओ पासिंगसाठी चंद्रपूरला जातात. त्या ठिकाणी असलेल्या एसटीच्या विभागीय भांडारमधून बसगाड्यांमध्ये नवीन प्रथमोपचार किट लावली जाते. पण गडचिरोली विभागातील बसगाड्यांना अनेक दिवसात सदर किट मिळाल्याच नसल्याचे प्रत्यक्ष पाहिलेल्या स्थितीवरून दिसून येते. कोरोनाच्या काळात एसटी महामंडळाचे उत्पन्न चांगलेच घटले. त्यामुळे नवीन किटची खरेदीच झाली नसल्याचे शंका व्यक्त केली जात आहे. भांडार विभागात प्रथमोपचार किटचा तुटवडा असल्याची माहिती मिळाली.

वाय-फाय सुविधेबाबत नेमके काय झाले याबाबतची माहिती घ्यावी लागेल. पण प्रथमोपचार किट बस वाहकाकडे असतात. किट बॉक्समधील साहित्य चोरीला जाते म्हणून वाहकाकडे ते ठेवले जाते. प्रवाशांना जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचा महामंडळाचा प्रयत्न असतो.

- अशोक वाडीभस्मे

विभाग नियंत्रक, गडचिरोली