शहरं
Join us  
Trending Stories
1
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
2
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
3
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
4
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
5
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
6
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
7
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
8
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
9
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
10
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
11
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
12
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
13
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
14
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
15
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
16
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
17
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
18
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
19
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
Daily Top 2Weekly Top 5

कावड अन् पायपीट केव्हा संपणार? रानडुकराच्या हल्ल्यातील जखमींना वाचवतानाचे विदारक वास्तव समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 16:37 IST

Gadchiroli : भामरागड तालुक्यातील दुर्गम दर्भा परिसरात रानडुकरांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून दोन दिवसांत दोन जणांना जखमी केले. मात्र, या भीषण घटनेने प्रशासकीय सुविधांचे वाभाडे काढले असून, जंगलात रस्ता नसल्याने जखमीला चक्क कावड करुन एक किलोमीटरची पायपीट करत मुख्य रस्त्यापर्यंत आणावे लागले.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भामरागड तालुक्यातील दुर्गम दर्भा परिसरात रानडुकरांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून दोन दिवसांत दोन जणांना जखमी केले. मात्र, या भीषण घटनेने प्रशासकीय सुविधांचे वाभाडे काढले असून, जंगलात रस्ता नसल्याने जखमीला चक्क कावड करुन एक किलोमीटरची पायपीट करत मुख्य रस्त्यापर्यंत आणावे लागले. ही हृदयद्रावक दृश्ये दुर्गम भागातील संघर्षाची साक्ष देत आहेत.

पहिली घटना ३० एप्रिल रोजी सकाळी ९:३० च्या सुमारास घडली. दर्भा येथील मुल्ला चैतु पिडसे (५०) हे तेंदूपत्ता हंगाम जवळ आल्याने दोरी आणण्यासाठी धोडराजच्या जंगलात गेले होते. दरम्यान, एका रानडुकराने त्यांच्यावर झडप घालून पोटावर जबर हल्ला केला सोबतच्या लोकांनी आरडाओरडा केल्याने डुक्कर पळाले, पण मुल्ला गंभीर जखमी झाले होते.

जंगलात रुग्णवाहिका जाणे अशक्य असल्याने ग्रामस्थांनी तात्काळ बांबूची कावड तयार केली. गंभीर जखमी मुल्ल यांना त्या कावडीत बांधून सुमारे एक किलोमीटरची डोंगरदऱ्यातून पायपीट केली. मुख्य रस्त्यावर रुग्णवाहिका आल्यानंतर त्यांना भामरागड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले.

दुसऱ्या दिवशी महिलेवर हल्ला

ही घटना ताजी असतानाच १ मे रोजी सकाळी १०:३० वाजता याच गावातील मादी टुगे पुंगाटी (४५) या महिलेवर रानडुकराने हल्ला केला. यात त्यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. दोघांचीही प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

भरपाई देण्याची मागणी

तेंदूपत्ता संकलन सुरू होण्यापूर्वीच वन्य प्राण्यांचे हल्ले वाढल्याने मजुरांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. वनविभागाने या परिसरात गस्त वाढवून जखमींना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Wild boar attacks in Gadchiroli: Villagers carry injured on makeshift stretcher.

Web Summary : In Gadchiroli, wild boar attacks injured two villagers. Due to lack of roads, villagers carried victims one kilometer on a makeshift stretcher to reach medical help. Locals demand increased forest patrols and financial assistance.
टॅग्स :GadchiroliगडचिरोलीAnimal Attackवन्य प्राण्यांचा हल्लाMaharashtraमहाराष्ट्र