शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

सात कर्मचाऱ्यांवर एसटी विभागीय कार्यालयाचा भार

By admin | Updated: January 8, 2015 22:55 IST

एक वर्षापूर्वी स्थापन झालेल्या एसटीच्या विभागीय कार्यालयाचे काम चंद्रपूर येथूनच सांभाळले जात असून या ठिकाणी केवळ आता सात कर्मचारी कार्यरत आहेत.

गडचिरोली : एक वर्षापूर्वी स्थापन झालेल्या एसटीच्या विभागीय कार्यालयाचे काम चंद्रपूर येथूनच सांभाळले जात असून या ठिकाणी केवळ आता सात कर्मचारी कार्यरत आहेत. गडचिरोली वगळता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एसटी विभागाने स्वतंत्र विभागीय कार्यालय स्थापन केले आहे. मात्र जिल्ह्याची निर्मिती होऊन ३० वर्षांचा कालावधी लोटला तरी गडचिरोली येथे विभागीय कार्यालय नव्हते. त्यामुळे गडचिरोली येथे विभागीय कार्यालय स्थापन करावे, यासाठी एसटी प्रशासनावर दबाव वाढत गेल्यानंतर मागील वर्षी २६ जानेवारी रोजी गडचिरोली येथे विभागीय कार्यालय स्थापन करण्यात आले. विभागीय कार्यालयात आस्थापना शाखा, लेखा शाखा, वाहतूक शाखा, सुरक्षा शाखा, सांख्यीकी शाखा, स्थापत्य शाखा असणे आवश्यक आहे. यासाठी गडचिरोली येथील विभागीय कार्यालयात ६० कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यापैकी केवळ आस्थापना शाखेचे सहा कर्मचारी व लेखा विभागाचा एक कर्मचारी असे एकूण केवळ सात कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहेत. या सात कर्मचाऱ्यांना संपूर्ण विभागीय कार्यालयाचा कारभार सांभाळणे अशक्य असल्याने बहुतांश कामे चंद्रपूर येथूनच केली जातात. या ठिकाणी केवळ रजा व पगारवाढ ही दोनच कामे केली जात आहेत. त्यामुळे येथील विभागीय कार्यालय केवळ नावापुरतेच असल्याची टीका केली जात आहे. विशेष म्हणजे कार्यालय सुरू झाले. त्यावेळी या ठिकाणी बारा कर्मचारी कार्यरत होते. आता केवळ सात कर्मचारी शिल्लक आहेत. एवढेच नाही तर वाहतूक नियंत्रकाचा प्रभार चंद्रपूर येथील मोटार यंत्र अभियंता एम. के. सहारे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. येथील विभागीय कार्यालयाला स्वतंत्र इमारत नाही. एका लहानशा इमारतीमध्ये विभागीय कार्यालय चालविले जात आहे. विभागीय कार्यालयासाठी प्रशस्त जागा उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करीत काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विभागीय कार्यालय चंद्रपूर येथे हलविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. एसटीने या ठिकाणी प्रशस्त इमारत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.विभागीय कार्यालय चंद्रपूर येथे गेल्यास पुन्हा ते गडचिरोली येथे आणणे अशक्य आहे. चंद्रपूरवरून गडचिरोली येथे ये-जा करणारे काही कर्मचारी व अधिकारीच चंद्रपूर येथे कार्यालय हलविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याची माहिती आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी कार्यालय हलविण्यास तीव्र विरोध करावा, अशीही मागणी आहे. (नगर प्रतिनिधी)