शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

मास्क लावतो, की धंदा बंद ठेवतो भाऊ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2022 05:00 IST

संक्रांतीनिमित्त विविध वस्तूंच्या खरेदीसाठी मार्केटमध्ये महिला ग्राहकांची संख्या वाढली आहे. पण समुहाने येणाऱ्या महिला बहुतांश वेळा मास्कचा वापरच करत नसल्याचे दिसून येते. अनेकींच्या नाकावरील मास्क खाली घसरलेला असतो. काहींचा मास्क तर नाक आणि तोंडही न झाकता केवळ हनुवटी झाकत असल्याचे दिसून आले.ग्राहकांची गर्दी पाहता दुकानदारांनाही त्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोनाची तिसरी लाट जिल्ह्यात दाखल झाली असून दैनंदिन कोरोना रुग्णांनी आता शतकही गाठले आहे. असे असताना नागरिक मात्र कोरोनाचे नियम पाळण्यात अजूनही बिनधास्तपणे दाखवत आहेत. संक्रांतीनिमित्त विविध वस्तूंच्या खरेदीसाठी मार्केटमध्ये महिला ग्राहकांची संख्या वाढली आहे. पण समुहाने येणाऱ्या महिला बहुतांश वेळा मास्कचा वापरच करत नसल्याचे दिसून येते. अनेकींच्या नाकावरील मास्क खाली घसरलेला असतो. काहींचा मास्क तर नाक आणि तोंडही न झाकता केवळ हनुवटी झाकत असल्याचे दिसून आले.ग्राहकांची गर्दी पाहता दुकानदारांनाही त्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही. 

मास्क ना दुकानदारांना-    गडचिरोलीच्या मार्केट लाईनमध्ये बहुतांश मोठ्या दुकानांमध्ये दुकानदार मास्कचा वापर करतात. पण काहींचा मास्क खाली सरकलेले असतात. दमकोंडी होत असल्याने सतत नाकावर मास्क ठेवत नसल्याचे एकाने सांगितले.-    काही छोटे व्यावसायिक मात्र बिनधास्त राहतात. त्यांना कोणत्याची निर्बंधांची फिकीर नसते. तिथे येणारे ग्राहकही मग दुकानदाराचे अनुकरण करतात.

ना ग्राहकांना-    दुकानांमध्येच नाही तर मार्केट लाईनमध्ये फेरफटका मारला तरी अर्ध्यापेक्षा जास्त लोक मास्कविना दिसतात. तरीही त्यांच्यावर नगर परिषद किंवा इतर कोणत्याही यंत्रणेकडून दंडात्मक कारवाई होत नाही. त्यामुळे लोकांचा बिनधास्तपणा कायम आहे. 

ग्राहक ऐकतच नाहीत

ग्राहकांनी आपली सामाजिक जबाबदारी ओळखून मास्कचा वापर करावा. आम्ही ग्राहकांना विनंती करतो. आमच्या समाधानासाठी ते जवळचा मास्क नाकातोंडावरही घेतात. पण त्यांनी नेहमीसाठीच हे लक्षात ठेवले पाहिजे.- मनोज देवकुले, दुकानदार

दुकानात येणाऱ्यांना मास्कसाठी सांगताे. पण लोक ऐकत नाही. त्यांना जास्त आग्रह केला तर नाराज होतात. कोणीही ग्राहक नाराज होणे दुकानदाराला आवडणार नाही. ग्राहकांनीच स्वत:हून मास्क घालावा.- भारती भोयर, दुकानदार

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार