मुरूमगावात पाणीटंचाई, महिलांची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:34 IST2021-04-13T04:34:51+5:302021-04-13T04:34:51+5:30

धानाेरा तालुक्यातील महत्त्वपूर्ण व माेठी ग्रामपंचायत म्हणून मुरूमगावची ओळख आहे. या परिसरात अनेक गावे येतात. तसेच महत्त्वपूर्ण कार्यालये तसेच ...

Water scarcity in Murumgaon, women wandering | मुरूमगावात पाणीटंचाई, महिलांची भटकंती

मुरूमगावात पाणीटंचाई, महिलांची भटकंती

धानाेरा तालुक्यातील महत्त्वपूर्ण व माेठी ग्रामपंचायत म्हणून मुरूमगावची ओळख आहे. या परिसरात अनेक गावे येतात. तसेच महत्त्वपूर्ण कार्यालये तसेच शाळा मुरूमगावातच आहेत. गावाचा व्याप पाहता येथे मूलभूत साेयीसुविधा दिसून येत नाही. दरवर्षी उन्हाळ्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण हाेते. याचा त्रास गावातील महिलांना सर्वाधिक हाेताे. मुरूमगाव येथे नळ याेजना आहे. हातपंप व विहिरी आहेत. परंतु पाण्याची पातळी खालावल्याने पुरेसे पाणी उपलब्ध हाेत नाही. काही हातपंप सध्या बंद अवस्थेत आहेत. पाणीटंचाई निर्माण हाेऊ नये यासाठी स्थानिक प्रशासनाने उन्हाळ्यापूर्वीच याेग्य उपाययाेजना करणे आवश्यक हाेते. परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले. ग्रामसचिवांसह ग्रा. पं. पदाधिकारीसुद्धा गावातील समस्या साेडविण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत, असा आराेप नागरिकांनी केला आहे. उन्हाळ्याचे पुन्हा दाेन महिने शिल्लक असताना आताच पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पाणीटंचाईची समस्या पुन्हा तीव्र हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून पाणीटंचाईची समस्या साेडवावी, अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.

बाॅक्स

याेग्य उपाययाेजना करण्याची मागणी

मुरूमगाव येथे दरवर्षी उन्हाळ्यात नागरिकांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागताे. परंतु स्थानिक प्रशासनाकडून याेग्य उपाययाेजना केल्या जात नाही. जलपातळी खालावत असल्याने ही समस्या दरवर्षी उद्भवणारी आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने याेग्य व ठाेस उपाययाेजना कराव्या. यासाठी नवीन पाणीयाेजना कार्यान्वित करावी किंवा गावातील जलस्त्राेतांची संख्या वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.

Web Title: Water scarcity in Murumgaon, women wandering