शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
5
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
6
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
7
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
8
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
9
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
10
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
11
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
12
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
13
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
14
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
15
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
16
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
17
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
18
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
19
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
20
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
Daily Top 2Weekly Top 5

गडचिराेलीमध्ये पाणीटंचाईचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2022 05:00 IST

नगरपालिका प्रशासनाच्या वतीने नळाद्वारे शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी जवळपास सात जलकुंभ उभारण्यात आले आहेत. दाेन ठिकाणी नवीन जलकुंभ झाले आहेत. वाॅर्डावाॅर्डांत पाईपलाईन टाकून नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाताे. वैनगंगा नदीवरील बाेरमाळा घाटावर पालिका प्रशासनाचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. नदीच्या विहिरीतून जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणले जाते. तेथून शहरभरातील जलकुंभांमध्ये पाणीपुरवठा केला जाताे. येथून पाईपलाईनद्वारे नळधारकांना सकाळी व सायंकाळच्या सुमारास पाणी दिले जाते. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : स्थानिक नगरपालिका प्रशासनाच्या वतीने नळ पाणीपुरवठा याेजनेच्या माध्यमातून गडचिराेली शहरातील नागरिकांना नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाताे. मात्र एप्रिल महिन्यापासूनच पालिकेची पाणी याेजना प्रभावित झाली आहे. वैनगंगा नदीची पाणीपातळी खालावल्याने आत्तापासूनच गडचिराेली शहरात पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले  आहे. नगरपालिका प्रशासनाच्या वतीने नळाद्वारे शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी जवळपास सात जलकुंभ उभारण्यात आले आहेत. दाेन ठिकाणी नवीन जलकुंभ झाले आहेत. वाॅर्डावाॅर्डांत पाईपलाईन टाकून नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाताे. वैनगंगा नदीवरील बाेरमाळा घाटावर पालिका प्रशासनाचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. नदीच्या विहिरीतून जलशुद्धीकरण केंद्रात पाणी आणले जाते. तेथून शहरभरातील जलकुंभांमध्ये पाणीपुरवठा केला जाताे. येथून पाईपलाईनद्वारे नळधारकांना सकाळी व सायंकाळच्या सुमारास पाणी दिले जाते. दरवर्षी शहरात एप्रिल महिना लागला की, वाढत्या उष्णतामानामुळे पाण्याचे प्रमाण कमी हाेते. दरम्यान केवळ २० ते २५ मिनिटे नळाद्वारे पाणीपुरवठा हाेते. केवळ काही सखल भाग साेडला तर बऱ्याच वाॅर्डांत एप्रिल, मे व जून महिन्यांत अल्प पाणीपुरवठा हाेताे. राष्ट्रीय महामार्गाच्या कामादरम्यान अनेकदा चामाेर्शी मार्गावरील पाईपलाईन फुटून नळ पाणीपुरवठा प्रभावित झाला हाेता. त्या वेळी नळधारकांनी विहीर व बाेअरचा आधार घेतला. 

चार दिवस गाेकुलनगरातील पाणीपुरवठा बंदचामाेर्शी मार्गावरील ४५० एमएस रायझिंग मेन पाईपलाईन शिफ्टिंगचे काम ४ व ५ मे राेजी करण्यात आले. त्या वेळी शहरातील पाणीपुरवठा दाेन दिवस बंद राहणार असल्याचे न. प. प्रशासनाने जाहीर केले हाेते. मात्र गाेकुलनगर व माता मंदिर परिसरातील नळ पाणीपुरवठा तब्बल चार ते पाच दिवस बंद हाेता. माता मंदिर परिसरात १० मे राेजी मंगळवारला सायंकाळच्या सुमारास नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. परिणामी या भागातील नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागला.

एकच वेळ हाेताे पाणीपुरवठा-    उन्हाळ्यामध्ये पाण्याची अधिकाधिक गरज भासते. त्याचा वापरही वाढत असताे. मात्र पाणीटंचाईमुळे पुरेसे पाणी मिळत नाही. आता गेल्या आठ दिवसांपासून गाेकुलनगर, माता मंदिर परिसर व शहरातील बऱ्याच वाॅर्डांत केवळ २० ते २५ मिनिटे दिवसातून एकदाच नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. येत्या काही दिवसांत गडचिराेली शहरात पाणी संकट पुन्हा तीव्र हाेणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा.

 

टॅग्स :water shortageपाणीकपात