पूजनातून जलसंवर्धनाचा संकल्प

By Admin | Updated: August 18, 2016 01:37 IST2016-08-18T01:37:07+5:302016-08-18T01:37:07+5:30

जिल्ह्यात स्वातंत्र्य दिनी ठिकठिकाणी लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते जलपूजन करून जलसंवर्धनाचा संकल्प करण्यात आला.

Water conservation plan for worship | पूजनातून जलसंवर्धनाचा संकल्प

पूजनातून जलसंवर्धनाचा संकल्प

योजनेची माहिती : वांगेपल्लीत अप्पर जिल्हाधिकारी तर रेगडीत आमदारांच्या हस्ते पूजन
अहेरी/ घोट : जिल्ह्यात स्वातंत्र्य दिनी ठिकठिकाणी लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते जलपूजन करून जलसंवर्धनाचा संकल्प करण्यात आला.
अहेरी- तालुक्यातील वांगेपल्ली येथील वनिता डुंगा कोरामी यांच्या शेतात अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. अहेरी उपविभागात सिंचनाच्या सोयी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना एकेरी उत्पन्न घेणे अवघड होते. परंतु कोरामी यांनी निर्माण केलेल्या शेततळ्याकडे पाहता, प्रत्येक शेतकऱ्यांनी ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेचा लाभ घेऊन आपल्या उत्पन्नात वाढ करावी, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड यांनी केले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी व्ही. जी. तांबे, उपविभागीय अधिकारी एस. राममूर्ती, तहसीलदार पुरके, नगराध्यक्ष प्राजक्ता पेदापल्लीवार, न. पं. उपाध्यक्ष अन्नपूर्णा सिडाम, नगरसेविका मालू इष्टाम, रेखा सडमेक, माया बिटपल्लीवार, दामोधर सिडाम, वाघमारे, आर. एस. गोरे, पी. के. शंभरकर, सचिन जाधव, के. एस. लोनडगले, महेश इंगळे, सचिन गोमासे उपस्थित होते.
घोट - रेगडी येथील कन्नमवार जलाशयात आ. डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. परंतु पाणी मिळत नसल्याच्या कारणावरून १४ गावातील प्रतिनिधींनी आ. डॉ. देवराव होळी यांना अटकाव केला. परंतु आ. डॉ. होळी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन केशव खोब्रागडे, मोतिराम लाटेलवार, गणेश कांदो, गोपीनाथ बकावार, गुरूदास पालकवार यांना दिले. त्यानंतर आ. डॉ. देवराव होळी यांनी धरणाचे वक्र गेट फिरवून पाणी सोडले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते मनोज पालारपवार, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, पं. स. उपसभापती मंदा दुधबावरे, भाजप तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, साबांविचे उपविभागीय अभियंता गावळ, सिंचाई विभागाचे कनिष्ठ अभियंता व्ही. जी. आदेवार, लांडगे, साईनाथ बुरांडे, तुरे, नेवारे, दुधबावरे, नेवारे, शहा, उपाध्ये हजर होते.

 

Web Title: Water conservation plan for worship