शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

काेरची तालुक्यातील डाॅक्टरांचा काम बंदचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:35 IST

काेरची : तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी आपले कार्य मुख्यालयी राहून योग्यप्रकारे बजावत असताना, काही नागरिक त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न ...

काेरची : तालुक्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी आपले कार्य मुख्यालयी राहून योग्यप्रकारे बजावत असताना, काही नागरिक त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे डाॅक्टरांचे मनाेधैर्य खचत आहे. बदनामी करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करावी, अन्यथा काम बंद आंदाेलन करण्याचा इशारा तालुका आराेग्य अधिकारी यांच्यासह डाॅक्टरांनी काेरचीचे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कोरची तालुक्यातील एकूण २२ वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी १ तालुका आरोग्य अधिकारी, ६ वैद्यकीय अधिकारी, ४ मानसेवी वैद्यकीय अधिकारी व ११ समुदाय आरोग्य अधिकारी कार्यरत आहेत. गावातील जनतेस आम्हाकडून कसल्याच प्रकारचा त्रास नसूनसुद्धा गावातील काही विक्षिप्त प्रवृत्तीचे लोक आमची बदनामी करीत आहेत. उपकेंद्राची चावी मागणे, व्यक्तीश: धमकी देणे, पैशाची मागणी करणे, असे प्रकारसुद्धा करीत आहेत. तसेच समाजात आमची प्रतिमा मलिन करून आमचे मानसिक धैर्य खचवायचे प्रयत्न करीत आहेत.

मागील चार वर्षांत २ मातांसह १३ बालकांचा मृत्यू झाल्याची खोटी बातमी पसरवत आहेत. वास्तविक २ माता व ५ बालक मृत पावले आहेत. दोन मातांपैकी एक माता सिकलसेल पीडित कारणाने नागपूरला रेफर होऊन मरण पावली. दुसरी माता नवेझरीवरून कोरची व नंतर गडचिरोली रेफर झाली. पुढे चंद्रपूरला रेफर करताना रस्त्यावरच मृत्यू पावली.

अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त भागात वीज, वाहतुकीची सोय व इंटरनेटची सुविधा नसताना, कोरोना काळामध्ये अतिरिक्त ताण असताना मुख्यालयी राहून आरोग्यसेवा निरंतर देत आहोत. संबंधित बातमीची सखोल चौकशी करून दोषी व्यक्तींवर गुन्हा दाखल करावा, अन्यथा तालुक्यातील डाॅक्टर कामबंद आंदाेलन करतील, इशारा दिला आहे.