शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
3
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
4
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
5
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
6
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
7
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
8
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
9
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
10
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
11
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
12
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
13
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
14
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
15
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
16
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
17
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
18
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
19
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
20
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
Daily Top 2Weekly Top 5

गोदाम फुल्ल, धान खरेदी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:35 IST

फाेटाे .... वैरागड : मार्केटिंग फेडरेशनअंतर्गत वैरागड येथे आधारभूत धान खरेदी केंद्र शेतकऱ्यांच्या साेयीसाठी सुरू करण्यात आले. या केंद्रावर ...

फाेटाे ....

वैरागड : मार्केटिंग फेडरेशनअंतर्गत वैरागड येथे आधारभूत धान खरेदी केंद्र शेतकऱ्यांच्या साेयीसाठी सुरू करण्यात आले. या केंद्रावर ८५० शेतकऱ्यांनी नाेंदणी केली. नाेंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी केवळ १३५ जणांकडून धानाची खरेदी करण्यात आल्यानंतर गाेदाम फुल्ल झाले. त्यामुळे आठ दिवसापासून येथील धान खरेदी केंद्र बंद आहे. सध्या या केंद्रावर ६ हजार २९७ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. परंतु केंद्र बंद असल्याने शेतकऱ्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहे.

वैरागड धान खरेदी केंद्रावर धान विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नाेंदणी करून टाेकन मिळविले हाेते. त्यापैकी २०९ सातबारावरील धानाची खरेदी करण्यात आली. उर्वरित ६४० सातबारावरील नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे धान खरेदी करणे शिल्लक आहे. साठवणुकीअभावी धान खरेदी केंद्र बंद करण्यात आल्याने शेतकरी धान विक्रीच्या प्रतीक्षेत आहे. धान खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतर महाराष्ट्र राईस मिलच्या गोदामात १७ दिवस खरेदी झाली. या गोदामात साठवणूक झाल्यानंतर सात दिवस कृषी विभागाच्या गोदामात खरेदी करण्यात आली.

येथील सेवा सहकारी संस्थेचे गोदाम ग्रामपंचायतच्या जवळ आहे. पण विक्रीसाठी येणाऱ्या ट्रॅक्टरची संख्या लक्षात घेता, अडचण होणार म्हणून या ठिकाणी अजूनपर्यंत खरेदी सुरू करण्यात आली नाही. वैरागड धान खरेदी केंद्रावर आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव, वासाळा, चामोर्शी, वनखी येथील शेतकऱ्यांचे धान खरेदी केले जात असल्याने टोकन पद्धतीने नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. या केंद्रावर आतापर्यंत अधिकाधिक बाहेरगावच्या शेतकऱ्यांच्या धानाची जास्त खरेदी झाली आहे. अजूनही वैरागड येथील शेतकरी धान विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे धान ठेवण्यासाठी पर्यायी गाेदामाची व्यवस्था करावी अथवा खरेदी केलेल्या धानाची उचल करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

बाॅक्स ....

केंद्रावर शेतकऱ्यांचे हेलपाटे

वैरागड येथे आधारभूत खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतर केवळ २४ ते २५ दिवसच धानाची खरेदी झाली. गाेदाम भरल्याच्या नावाखाली धान खरेदी बंद करण्यात आली. त्यामुळे बाहेरगावाहून येणारे शेतकरी आपला क्रमांक केव्हा लागणार, यासाठी केंद्रावर वारंवार हेलपाटे मारत आहेत. यात त्यांना बराच त्रास सहन करावा लागत आहे.