शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

दामरंचा मार्गावरील तलाव खोलीकरणाच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: August 25, 2016 01:04 IST

गडचिरोली जिल्ह्यातील तलावाच्या क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून तिसऱ्या क्रमांकाचा नवीन तलाव दामरंचा मार्गावर आहे.

कालवा लिकेज : २५ हेक्टर क्षेत्र असलेला तिसऱ्या क्रमांकाचा तलावश्रीधर दुग्गीरालापाठी कमलापूरगडचिरोली जिल्ह्यातील तलावाच्या क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून तिसऱ्या क्रमांकाचा नवीन तलाव दामरंचा मार्गावर आहे. सदर तलाव २५ हेक्टर क्षेत्रामध्ये व्यापलेला आहे. मात्र गेल्या २७ वर्षांपासून एकदाही या तलावाचे खोलीकरण करण्यात आले नाही. तसेच या तलावाचा कालवा अनेक ठिकाणी लिकेज असल्याने येथील पाणी व्यर्थ जात आहे. परिणामी कमलापूर, चिंतलगुडम, कोळसेलगुडम, थिमारगुडम या क्षेत्रातील शेकडो शेतकरी पुरेशा सिंचन सुविधेपासून वंचित आहेत.दामरंचा मार्गावरील या तलावात ३०० ते ४०० हेक्टर शेतीला पाणी पुरेल एवढा पाणीसाठा या तलावात आहे. मात्र या तलावाचा कालवा अनेक ठिकाणी लिकेज असल्याने पाणी व्यर्थ जात आहे. या तलावाचे खोलीकरण करणे अत्यावश्यक आहे. यासंदर्भात कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग चंद्रपूर यांना निवेदन करून त्यांच्याकडे वारंवार पाटपुरावा करण्यात आला. मात्र सदर तलावाच्या खोलीकरण व नव्या कालव्याच्या निर्मितीकडे या विभागाच्या अधिकाऱ्यांनी पूर्णत: दुर्लक्ष केले. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना दरवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागतो. कमलापूरवरून ४ किमी अंतरावर असलेले सदर नवीन तलाव हे पर्यटनस्थळसुद्धा बनलेले आहे. येथे वन विभागाचे हत्ती कॅम्प आहे. तसेच सभोवताल पहाडी व निसर्गरम्य वातावरण तसेच नागमाता मंदिरही आहे. त्यामुळे शासनाने सदर स्थळाला पर्यटन स्थळ म्हणून घोषित केल्यास या भागाच्या विकासाला चालना मिळेल. उपसा सिंचन योजनेतून दामरंचा नजीकच्या नदीतील पाणी या तलावात सोडण्यात यावे, यातून मोठी शेती सिंचन सुविधा निर्माण होऊ शकते. सदर तलावाच्या खोलीकरणासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. लोकप्रतिनिधींचा कानाडोळानिवडणुकीच्या वेळी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नेते दामरंचा गावात येऊन नागरिकांना सदर तलावाचे खोलीकरण करण्यात येईल, तसेच नवीन कालवा तयार करण्यात येईल, असे आश्वासन देतात. मात्र निवडून आलेल्या एकाही लोकप्रतिनिधींनी आजपर्यंत या तलावाच्या दुरूस्तीच्या कामाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे या भागातील शेतकरी लोकप्रतिनिधी व राजकीय नेत्यांच्या कार्यप्रणालीबाबत प्रचंड नाराज आहेत.