शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

१२८७ गावांना ९०.१७ लाखांची प्रतीक्षा

By admin | Updated: January 7, 2015 22:52 IST

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत यंदा जिल्ह्यातील एकूण १ हजार २८७ गावांकरिता शासनाने ९० लाख १७ हजार रूपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी ग्रामस्थांच्या आरोग्य व सुविधांसाठी खर्च करण्यात येणार आहे.

गडचिरोली : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत यंदा जिल्ह्यातील एकूण १ हजार २८७ गावांकरिता शासनाने ९० लाख १७ हजार रूपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी ग्रामस्थांच्या आरोग्य व सुविधांसाठी खर्च करण्यात येणार आहे. मात्र वर्ष संपायला केवळ दोन महिने शिल्लक असले तरी हा निधी अद्याप उपलब्ध न झाल्याने संबंधीत लाभार्थ्यांना फटका बसत आहे. जिल्ह्यात एकूण ४६७ ग्रामपंचायती असून १ हजार ६६० गावे आहेत. एनआरएचएम अंतर्गत १ हजार २८७ गावांसाठी ९० लाख १७ हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला. सदर निधी खर्च करण्यासाठी एक समिती गठित करण्यात येते. या समितीच्या अध्यक्षपदी गावचे सरपंच तर सदस्यपदी गावातील अंगणवाडी सेविका राहते. दोघांच्या नावे बँकेत खाते उघडले जाते. नंतर सदर नियोजित निधी त्या खात्यामध्ये जमा केल्या जाते. यानंतर समिती प्रस्ताव आमंत्रित करून निधी खर्च करते. गावातील स्वच्छता, पाणीपुरवठा व आरोग्याशी संबंधीत इतर कामे या निधीतून केली जातात. यासाठी केंद्र शासनाकडून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत राज्यशासनाकडे व त्यानंतर जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण संस्थेकडे सदर निधी दिला जातो. या निधीतून ग्राम आरोग्य योजना, न्युट्रिशन डे, आरोग्यविषयक ग्रामसभा, ग्राम आरोग्यासाठी खरेदी, कुपोषित बालकांसाठी पोषक तत्त्व योजना, गरोदर महिलांच्या प्रसूतीसाठी प्रवासाची सोय, कुत्रा किंवा सर्पदंश झाल्यास रुग्णालयापर्यंतचा मोफत प्रवास व औषधोपचार तसेच गावागावात आरोग्यविषयक जनजागृतीसाठी खर्च करण्याची तरतूद आहे. याशिवाय गावात होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे शुद्धिकरण, शासकीय नळ तुटल्यास त्याची सुधारणा, अंगणवाडीची रंगरंगोटी, दुरूस्ती, फर्निचर तसेच अंगणवाडीतील बालकांसाठी खेळणी खरेदी करण्यावरही सदर निधी खर्च केला जातो. या योजनेतून ० ते ५०० लोकसंख्या असलेल्या गावास ५ हजार रूपये, ५०१ ते १ हजार ५०० लोकसंख्या असलेल्या गावास ८ हजार रूपये, १ हजार ५०१ ते ५ हजार लोकसंख्या असलेल्या गावास १५ हजार रूपये, १० हजारापर्यंत लोकसंख्या असलेल्या गावास २४ हजार रूपये व १० हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावास ३० हजार रूपयांचे अनुदान दिले जाते. मात्र निधीच उपलब्ध झाला नसल्याने ही सर्व कामे ठप्प पडली आहेत. गडचिरोली जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण अधिक आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी या निधीची अत्यंत आवश्यकता होती. मात्र निधीच प्राप्त झाले नसल्याने समितीसमोर फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. परिणामी लाभार्थ्यांना आरोग्य सुविधांचा लाभ मिळत नसल्याने त्यांच्यात नाराजी पसरली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)