वैनगंगा नदी दुथडी भरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 05:00 IST2020-07-18T05:00:00+5:302020-07-18T05:00:52+5:30

गडचिरोली जिल्ह्यात अजुनही पाहिजे तेवढा पाऊस झाला नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, अशा शेतकऱ्यांनीच रोवणीला सुरूवात केली आहे. इतर शेतकरी मात्र अजुनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरण वैनगंगा नदीवर बांधण्यात आले आहे. सदर प्रकल्प ३८.९८ टक्के भरला आहे. या धरणाचे तीन दरवाजे गुरूवारी उघडण्यात आले.

The Wainganga River overflowed | वैनगंगा नदी दुथडी भरली

वैनगंगा नदी दुथडी भरली

ठळक मुद्देमेडिगड्डाचे दरवाजे उघडले : काही भागात पाऊस झाल्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गोसेखुर्द धरणाचे तीन दरवाजे गुरूवारी उघडण्यात आले. तसेच भंडारा व गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस झाल्याने वैनगंगा नदी दुथडी भरून वाहात आहे. विशेष म्हणजे, यावर्षीच्या पावसाळ्यात वैनगंगा नदी पहिल्यांदाच दुथडी भरून वाहत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात अजुनही पाहिजे तेवढा पाऊस झाला नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, अशा शेतकऱ्यांनीच रोवणीला सुरूवात केली आहे. इतर शेतकरी मात्र अजुनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरण वैनगंगा नदीवर बांधण्यात आले आहे. सदर प्रकल्प ३८.९८ टक्के भरला आहे. या धरणाचे तीन दरवाजे गुरूवारी उघडण्यात आले. त्यामुळे वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. मात्र ती इशारापातळीच्याही खाली आहे. शुक्रवारी ते बंद करण्यात आले. सिरोंचा तालुक्यात गोदावरी नदीवर तेलंगणा राज्याने मेडिगड्डा बॅरेज बांधले आहे. या बॅरेजचे ३५ दरवाजे उघडण्यात आले. त्यातून १ लाख ५ हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: The Wainganga River overflowed