शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांनी नक्षलवाद्यांना जुमानले नाही

By admin | Updated: October 18, 2014 01:29 IST

तालुक्यातील ६० मतदान केंद्रावर १५ आॅक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पडली.

एटापल्ली : तालुक्यातील ६० मतदान केंद्रावर १५ आॅक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. एटापल्ली तालुक्यात पुरूष २३ हजार १३६ व महिला २१ हजार ६९५ असे एकूण ४४ हजार ८३१ मतदारांची संख्या आहे. यापैकी १४ हजार ५९४ पुरूष व ११ हजार १२८ महिला असे एकूण २५ हजार ७२२ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजाविला. एटापल्ली तालुक्यातील नागरिकांनी नक्षलवाद्यांच्या आवाहनाला न जुमानता उत्स्फूर्त मतदान केल्याने या तालुक्यात ५७.०४ टक्के मतदान झाले आहे. भारतीय निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाल्यानंतर सुरूवातीपासूनच नक्षलवाद्यांनी तालुक्यातील दुर्गम भागातील गावात बॅनर बांधून तसेच पत्रक टाकून विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. याशिवाय नक्षल्यांनी निवडणुकीच्या काळात हिंसक कारवाया सुरूच ठेवल्या होत्या. नक्षलवाद्यांच्या विरोधाला तसेच भीतीला न जुमानता एटापल्ली तालुक्यातीन नागरिकांनी या विधानसभा निवडणुकीत उत्स्फूर्तपणे मतदान केले. एप्रिल महिन्यात झालेले लोकसभा निवडणुकीत एटापल्ली तालुक्यातील मतदारांनी मोठ्या उत्साहात मतदान केले होते. त्यामुळे या तालुक्यातील मतदानाची टक्केवारी ६२ होती. पावसामुळे बांडीया नदीला भरपूर पाणी असल्यामुळे नदीपलिकडे असलेले दोलंदा, भापळा, सोहगाव आदी गावातील तीन केंद्र जारावंडी येथे हलविण्यात आले होते. तसेच बांडीया नदीपलीकडील कचरेल, बुर्गी, कुदरी या गावातील तीन मतदान केंद्र हालेवारा येथे हलविण्यात आले होते. या तीनही गावातील नागरिकांनी नदी पार करून जारावंडी येथील मतदान केंद्रावर येऊन मतदान केले. दोलंदा मतदान केंद्रावर ३८.६३ टक्के, भापडा ५३.२४ टक्के व सोहगाव येथे ३९.१८ टक्के मतदान झाले आहे. पोलीस विभागाच्यावतीने मतदारांना मतदान केंद्रावर पोहोचविण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. (तालुका प्रतिनिधी)