शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ समिती पंतप्रधानांना विचारणार जाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2016 01:17 IST

लोकसभा व महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र विदर्भ राज्य व शेतकऱ्यांसाठी उत्पादन खर्चासह...

३१ ला दिल्लीत धरणे आंदोलन : स्वतंत्र विदर्भ राज्य व शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचे काय?गडचिरोली : लोकसभा व महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र विदर्भ राज्य व शेतकऱ्यांसाठी उत्पादन खर्चासह ५० टक्के मुनाफा एवढा हमीभाव व शेतकऱ्यांच्या इतर समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते. परंतु सत्तेत येऊन बावीस ते तेवीस महिन्यांचा कालावधी उलटूनही स्वतंत्र विदर्भ राज्य व शेतकऱ्यांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. याचा जाब पंतप्रधानांना विचारण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने ३१ मार्च रोजी दिल्ली येथे जंतरमंतरवर धरणे आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत विदर्भ राज्य समितीच्या वतीने देण्यात आली.स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने २०१३, २०१५ व आता ३१ मार्चला धरणे आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात जिल्ह्यातून बहुसंख्य विदर्भवादी शेतकरी सहभागी होणार आहेत. स्वतंत्र विदर्भ राज्यासह कर्जमुक्ती, भारनियमन बंद, वीज दर निम्मे करणे, चार लाख नोकऱ्यांचा बॅकलॉग संपविणे यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन होणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. पत्र परिषदेला अ‍ॅड. वामनराव चटप, राम नेवले, डॉ. रमेश गजबे, अ‍ॅड. नंदा पराते, अरूण केदार, अरूण मुनघाटे, राजेंद्रसिंह ठाकूर, रमेश भुरसे, चंद्रशेखर भडांगे, प्रतिभा चौधरी, रमेश उप्पलवार, प्रा. ओमप्रकाश, समय्या पसुला, मीनाक्षी गेडाम, रमेश नायडू, रमेश बारसागडे, एजाज शेख, अमिता मडावी, रमेश मडावी व पदाधिकारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनाही निमंत्रणदिल्ली येथे ३१ मार्च रोजी होणाऱ्या धरणे आंदोलनात मार्गदर्शन करण्याकरिता तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखराव यांना विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने निमंत्रण पाठविण्यात आले आहे. समितीच्या वतीने २८ मार्च ते २ एप्रिलपर्यंत प्रमुख नेत्यांच्या भेटीही घेतल्या जाणार आहेत.