शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
2
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
3
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
4
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
5
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
6
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
7
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
8
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
9
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
10
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
11
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
12
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
13
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
14
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
15
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
16
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
17
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
18
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
19
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
20
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

७०८ कोरोना योद्धयांनी घेतली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:09 IST

देसाईगंज : ऐच्छिक असलेल्या कोरोना लस घेण्यात देसाईगंज तालुक्यातील शासकीय कार्यालयातील कोरोना योध्दा अग्रेसर आहेत. २६ जानेवारीपासून सुरू झालेल्या ...

देसाईगंज : ऐच्छिक असलेल्या कोरोना लस घेण्यात देसाईगंज तालुक्यातील शासकीय कार्यालयातील कोरोना योध्दा अग्रेसर आहेत. २६ जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरणात देसाईगंज ग्रामीण रूग्णालयातून ७०८ कोरोना योद्धयांनी कोरोना लस घेतलेली आहे. यात ४४२ पुरूष तर २६६ महिला योध्दांचा समावेश आहे.

कोरोनाच्या महामारीतून बचाव करण्यासाठी सरकारने आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत कोरोना परिस्थितीत लढा देणाऱ्या विविध शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी लस देणे सुरू आहे. अतिशय महाग असलेली ही कोरोना लस याेद्धयांसाठी नि:शुल्क दिली जात आहे. आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, सीआरपीएफ जवान, नगरपालिका कर्मचारी, महसूल विभागातील कर्मचारी, पंचायत समिती कर्मचारी, आशा स्वयंसेविका अशा नागरिकांसोबत प्रत्यक्ष संबंध येणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही लस दिली जात आहे. आतापर्यंत एकूण ७०८ कोरोना योध्दांनी लस घेतली आहे. यात ३२८ आरोग्य कर्मचारी असून ३८० इतर शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

लसिकरणात पुढे पत्रकार, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सुध्दा कोराेना लसिकरण करावयाचे आहे. लसीकरणाचा पहिला डोज घेतल्या नंतर २८ दिवसांनी दुसरा डोज घ्यावा लागणार आहे. लसीकरणाची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे.

काेट....

शासनाच्या आदेशाप्रमाणे लसीकरण सुरू आहे. शासनाने ठरवून दिलेल्या टप्प्यांनी कोरोना युध्दात प्रत्यक्ष सहभाग असलेल्या प्रत्येकांना लसीकरण होईल. लसीकरणाचा पहिला टप्पा झाल्यांनंतर नचुकता दुसरा डोज घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी मास्कसारख्या प्रतिबंदांत्मक उपायांचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे.

-डाॅ.अभिषेक कुमरे, तालुका वैद्यकीय अधिकारी