शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

४३७ सदस्यांची अविरोध निवड, १,०४१ जागांसाठी २,५७७ रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:58 IST

२६ ग्रामपंचायतींमध्ये अविरोध निवड देसाईगंज वगळता सर्वच तालुक्यात काही ग्रामपंचायती अविरोध निवडल्या गेल्या. त्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये काही जागांसाठी एकही ...

२६ ग्रामपंचायतींमध्ये अविरोध निवड

देसाईगंज वगळता सर्वच तालुक्यात काही ग्रामपंचायती अविरोध निवडल्या गेल्या. त्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये काही जागांसाठी एकही अर्ज आला नसल्यामुळे त्या रिक्त राहिल्या, पण ज्या जागांसाठी अर्ज त्या ठिकाणी एक-एकच अर्ज शिल्लक असल्याने त्या ग्रामपंचायतींमध्ये आता निवडणूक होणार नाही. अशा ग्रामपंचायतींमध्ये गडचिरोली तालुक्यात ४, धानोरा तालुक्यात १२, आरमोरी २, कुरखेडा ४ आणि कोरची तालुक्यात ४ ग्रामपंचायती आहेत.

आमदारांना द्यावा लागणार कोटीचा निधी

पहिल्या टप्प्यातील ६ तालुके गडचिरोली आणि आरमोरी विधानसभा क्षेत्रातील आहेत. अविरोध निवड होणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रत्येकी २५ लाखांचा विकास निधी देण्याचे आ. कृष्णा गजबे यांनी तर १५ लाखांचा निधी देण्याचे आ. डॉ. देवराव होळी यांनी जाहीर केले होते. आ. गजबे यांच्या क्षेत्रातील १० ग्रामपंचायती अविरोध तर आ. होळी यांच्या क्षेत्रातील ६ ग्रामपंचायती पूर्णपणे अविरोध निवडल्या गेल्या आहेत. आता त्यांना हा निधी आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून मिळेल.

८७ जागा राहणार रिक्त

एकही नामांकन न आल्यामुळे किंवा जे आले ते पुरेपूर नसल्यामुळे वैध ठरले नसल्यामुळे सहा तालुक्यात ग्रामपंचायत सदस्यांच्या ८७ जागा रिक्त राहणार आहेत. त्यात सर्वाधिक ४९ जागा धानोरा तालुक्यातील आहेत. याशिवाय गडचिरोली ९, आरमोरी २, कुरखेडा १५ आणि कोरची तालुक्यातील १२ जागांचा समावेश आहे. राखीव जागांसाठी जात प्रमाणपत्रासह इतर सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे योग्य उमेदवार मिळाले नसल्यामुळे त्या जागा रिक्त राहिल्या. त्या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पुढे पोटनिवडणूक होईल.