शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
3
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
4
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
6
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
7
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
8
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
9
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
10
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
11
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
12
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
13
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
14
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
15
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
16
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
17
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
18
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
19
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ जाहीर करताना काही गावांवर अन्याय

By admin | Updated: November 13, 2015 01:29 IST

राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करताना तालुका घटक न मानता गाव हा घटक ठेवून दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली.

शेतकऱ्यांची मागणी : ५० पैशापेक्षा अधिक पैसेवारी असलेल्या गावांना सवलती द्या
वैरागड : राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करताना तालुका घटक न मानता गाव हा घटक ठेवून दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली. त्यामुळे परंपरागत परिस्थितीने पैसेवारी काढताना काही गावांवर अन्याय झाला. ज्या गावाची आणेवारी ५० पैशापेक्षा अधिक आहे. अशाही गावांना कमी प्रमाणात का होईना सोयी- सवलती द्याव्या, अशी मागणी वैरागड परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
दुष्काळ जाहीर करताना प्रत्येक गावांची स्थिती वेगळी असल्याने ज्या गावांची पैसेवारी कमी आहे त्यांना मदत केलीच पाहिजे. परंतु आज ज्यांची पिके उभी आहेत. त्यांनी कोणत्या परिस्थिती पिके उभी केलीत याचाही विचार होणे गरजेचे आहे. पाण्याची कुठलीही सुविधा उपलब्ध नसताना अनेक शेतकऱ्यांनी एक ते दोन किलोमिटर अंतरावरून सिंचनाची सोय उलपब्ध करून पिकांना पाणी दिले व कसेबसे आपले पीक वाचविले. सिंचनाची सोय करताना भरपूर पैसा खर्च झाला. हा खर्च उत्पादन खर्चापेक्षा सिंचन सोयी व कीटकनाशकांवर अधिक झाला आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी कसेबसे धान पीक वाचविले. अशा शेतकऱ्यांनाही सोयी- सुविधा मिळणे गरजेचे आहे. ५० हून अधिक आणेवारी असणाऱ्या गावातील अनेक शेतकऱ्यांचे धान पीक पावसाअभावी नष्ट झाले. त्यामुळे या गावांतील अशा शेतकऱ्यांना शासनाच्या नियमांमुळे वंचित राहण्याची वेळ आली आहे. रोजगार हमी योजनेतून विविध कामे मंजूर करून वन, कृषी विभाग व ग्रा. पं. स्तरावर कामे सुरू करावीत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करताना गाव हा घटक गृहित धरला असला तरी ५० टक्केच्यावर पैसेवारी असणाऱ्या गावांना या वर्षात पाणी टंचाई व चारा टंचाईची झळ पोहोचणार आहे. त्यामुळे शासनाने अशाही गावांची दखल घ्यावी.
- मनोहर बावनकर, शेतकरी, वैरागड

या वर्षात दमट हवामानामुळे धान पिकावर प्रचंड रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे रोगांचा बंदोबस्त करताना शेतकऱ्यांचा बराच पैसा खर्च झाला. पैसा खर्च करूनही रोग आटोक्यात आला नाही. परिणामी शेतकरी हतबल झाला. त्यामुळे शासनाने या शेतकऱ्यांना मदत करावी.
- महेंद्र तावेडे, शेतकरी, वैरागड.

रबी हंगामही बुडाला
अत्यल्प पावसामुळे जमिनीतील ओलावा नष्ट झाल्याने यंदाचा रबी हंगामही बुडाला आहे. दरवर्षी शेतकरी उडीद, मूग, हरभरा, जवस, मसूर, ज्वारी, गहू यासह अनेक कडधान्य पिकाचे उत्पादन घेत होते. परंतु रबी हंगामासाठी आवश्यक असणारा ओलावा जमिनीत नसल्याने रबी हंगाम बुडाला आहे.