उडेरावासीयांना तेंदूपत्ता बाेनस व राॅयल्टीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:48 IST2021-02-05T08:48:42+5:302021-02-05T08:48:42+5:30

तक्रारीत म्हटले आहे की, तेंदूपत्ता राॅयल्टी व बाेनस १० सप्टेंबर २०२०ला द्यायचे हाेते. चार महिन्यांचा कालावधी उलटूनही तेंदूपत्ता मजुरांना ...

Uderavasis waiting for tendupatta banas and royalties | उडेरावासीयांना तेंदूपत्ता बाेनस व राॅयल्टीची प्रतीक्षा

उडेरावासीयांना तेंदूपत्ता बाेनस व राॅयल्टीची प्रतीक्षा

तक्रारीत म्हटले आहे की, तेंदूपत्ता राॅयल्टी व बाेनस १० सप्टेंबर २०२०ला द्यायचे हाेते. चार महिन्यांचा कालावधी उलटूनही तेंदूपत्ता मजुरांना बाेनस व ग्रामसभेला राॅयल्टी वितरित करण्यात आलेली नाही. श्रेयश ट्रेडर्सचे मुख्य व्यवस्थापक म्हणून रामदास जराते यांच्या नावाने करार करण्यात आला. जराते यांनी २२ लाख २५ हजार २६१ रुपयांचा धनादेश दिला. परंतु राेख पैसे आणून देणार असल्याने चेक जमा न करण्यास ग्रामसभेला सांगितले हाेते. यावर ग्रामसभेच्या सदस्यांनी विश्वास ठेवून धनादेश बँकेत जमा केला नाही. मात्र, कंत्राटदाराने राेख पैसेसुद्धा न देता जनतेची दिशाभूल केली आहे. आठ दिवसांत राॅयल्टी व बाेनस द्यावा, अन्यथा तीव्र आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून दिला आहे.

बाॅक्स ...

अनेक ग्रामसभांमध्ये हीच स्थिती

तालुक्यातील अनेक ग्रामसभांचे पैसे करारनामा करणाऱ्या कंत्राटदारांनी दिले नाहीत. त्यामुळे दिवसेंदिवस नागरिकांचा कंत्राटदारांवरील विश्वास उडत चालला आहे. कंत्राटदारांवर कठाेर कारवाई करण्याची गरज आहे.

Web Title: Uderavasis waiting for tendupatta banas and royalties