शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांपासून प्रेरकांना मानधनच नाही

By admin | Updated: October 26, 2016 01:34 IST

भारत सरकाच्या साक्षर भारत अभियानांतर्गत धानोरा तालुक्यात १२४ प्रेरकांची नेमणूक करण्यात आली आहे.

धानोरा : भारत सरकाच्या साक्षर भारत अभियानांतर्गत धानोरा तालुक्यात १२४ प्रेरकांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र या प्रेरकांना मागील दोन वर्षांपासून मानध देण्यात आले नाही. त्यामुळे प्रेरकांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे.धानोरा तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींमध्ये १२४ प्रेरकांची निवड करण्यात आली आहे. २०१२-१३ मध्ये या अभियानाची सुरुवात झाली. सुरुवातीला प्रत्येक ग्रामपंचायतीला प्रतिप्रेरक सहा हजार रूपये म्हणजेच दोन हजार रूपये महिना या दराने तीन महिन्यांचे मानधन दिल्या गेले. त्यानंतर एका वर्षानंतर दोन महिन्यांचे चार हजार रूपये मानधन दिले. डिसेंबर २०१५ मध्ये आठ महिन्यांचे १ हजार ६०० रूपये मानधन प्राप्त झाले. गटशिक्षणाधिकारी उचे यांच्याकडे मानधन देण्याबाबत डिसेंबर २०१५ ते मार्च २०१६ पर्यंत सतत पाठपुरावा केल्यानंतर ३१ मार्च २०१६ रोजी मानधनाचा धनादेश बँकेत पाठविला. १२४ प्रेरकांपैैकी ६९ प्रेरकांचे मानधन खात्यामध्ये जमा झाले. मात्र ५५ प्रेरकांच्या खात्यामध्ये मानधनच जमा झाले नाही. याबाबत गटशिक्षणाधिकारी उचे यांना विचारणा केली असता, बीडीओ बदलल्याने बँकेतील खाते बदल करण्यात आला नाही. त्यामुळे मानधन रखडले आहे, अशी माहिती दिली. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे ५५ प्रेरक मानधनापासून वंचित आहेत. पे्ररकांना दिवाळीपर्यंत मानधन मिळाले नाही तर तीव्र आंदोलनचा इशारा तालुका प्रेरक संघटनेचे अध्यक्ष सीताराम बडोदे यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)