शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा

By admin | Updated: August 24, 2016 02:21 IST

भाजप प्रणित केंद्र व राज्य सरकारच्या वतीने सर्वसामान्य व गरीब नागरिकांसाठी तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी नावीण्यपूर्ण योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

अशोक नेते यांचे प्रतिपादन : भाजपच्या आदिवासी आघाडीची बैठकगडचिरोली : भाजप प्रणित केंद्र व राज्य सरकारच्या वतीने सर्वसामान्य व गरीब नागरिकांसाठी तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी नावीण्यपूर्ण योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन खा. अशोक नेते यांनी केले. भाजपच्या आदिवासी आघाडीची बैठक सर्किट हाऊस येथे रविवारी पार पडली. यावेळी मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या बैठकीला प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. हरिश्चंद्र भोये, प्रदेश संघटनमंत्री कृष्णराव चव्हाण, प्रदेश महामंत्री आ. डॉ. अशोक उईके, डॉ. तुळशीराम गावित, भाजपचे प्रदेश सदस्य बाबुराव कोहळे, आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश गेडाम, प्रमोद पिपरे, देसाईगंजनचे नगराध्यक्ष श्याम उईके, डॉ. भारत खटी आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलतांना खा. अशोक नेते म्हणाले, शासकीय योजनांची पुस्तके, पत्रके लोकांपर्यंत पोहोचवून योजनेच्या लाभासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत. व त्यासाठी कुठे अर्ज करावा लागतो. याबाबतची माहिती जनतेला भाजपच्या कार्यकर्त्यांनी द्यावी, असे सांगितले. प्रा. हरिश्चंद्र भोये यांनी शासनाच्या आदिवासी विभागाच्या एकूण १३२ योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जनतेला सर्वतोपरी सहकार्य करावे. शासनाकडून ग्राम पंचायतीला दिला जाणारा पाच टक्के निधी गडचिरोली जिल्ह्यातील किती ग्राम पंचायतींना मिळाला, याची माहिती घेऊन विकास कामे करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. बैठकीला एटापल्ली पंचायत समितीचे सभापती दीपक फुलसंगे, मीना कोडाप, किरण कुलसंगे, वर्षा शेडमाके, कोमल कुलसंगे, वर्षा शेडमाके, सोनल कुलसंंगे, शंभूविधी गेडाम, पंढरी उईके, नेताजी आलाम, सुखदेव टेकाम, विजय कुमरे, संतोष सोयाम, हेमंत मानकर, रोशन मसराम, पल्लवी कन्नाके आदींसह भाजपचे बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी प्रकाश गेडाम यांनीही शासनाच्या आदिवासी लाभार्थ्यांच्या योजनांचा लाभ घेतांना काय अडचणी येतात त्या अडचणींवर मात कशी करावी, याबाबतची माहिती दिली. यावेळी भाजपच्या आदिवासी संघटनात्मक बाबीवर सखोल चर्चा करण्यात आली. (स्थानिक प्रतिनिधी)