शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकने कारला दिली जबर धडक

By admin | Updated: November 15, 2014 01:38 IST

आरमोरीकडून गडचिरोलीकडे येणाऱ्या कारला विरूद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने समोरून धडक दिल्याची घटना गडचिरोली-आरमोरी मार्गावर...

आरमोरी : आरमोरीकडून गडचिरोलीकडे येणाऱ्या कारला विरूद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने समोरून धडक दिल्याची घटना गडचिरोली-आरमोरी मार्गावर गाढवी नदीच्या पुलावर आज शुक्रवारी घडली. या अपघातात शिक्षक प्रमोद संगमवार हे किरकोळ जखमी झाले. तर कारचा मागील भाग क्षतीग्रस्त झाला. मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्राप्त माहितीनुसार, आज शुक्रवारी येथील शिक्षक प्रमोद संगमवार हे एमएच-४०-एसी-५०७४ क्रमांकाच्या कारने कुटुंबियांसह आरमोरीवरून गडचिरोलीकडे येत होते. दरम्यान गडचिरोलीकडून आरमोरीकडे जाणाऱ्या एमएच-३१-सीबी-७१७६ क्रमांकाच्या भरधाव ट्रकने कारला समोरून धडक दिली. यावेळी कारचा मागील भाग पुलाच्या एगलला धडक देऊन थोडा पुढे गेला व मागील चक्का एगलला अडकल्याने सदर कार नदीपात्रात कोसळली नाही. सदर अपघात भिषण होता. मात्र संगमवार कुटुंबियांना कोणतीही हानी पोहोचली नाही. यावेळी वाहनामध्ये संगमवार यांची पत्नी, मुलगी, सासू व चालकही होता. या अपघातात किरकोळ जखमी झालेल्या प्रमोद संगमवार यांना आरमोरीतील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच आरमोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोरे हे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. या घटनेसंदर्भात ट्रकचालक प्रशांत सुधाकर तिजारे रा. नागपूर याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे. (प्रतिनिधी)