शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा कोणत्याही कराराविना चीन दौरा संपला; इराण युद्धावर तोडगा निघालाच नाही
2
उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
3
इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधी ४५ दिवसांसाठी वाढवली; गाझामध्ये हमासचा लष्करप्रमुख ठार
4
आजचे राशीभविष्य - १६ मे २०२६, मोठा आर्थिक लाभ होणार; नवीन कामे पूर्ण होणार
5
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
6
अग्रलेख: महागाईच्या आगीत तेल! सर्वसामान्यांच्या खिशावरच टाच 
7
मुलाखत: ‘कार्व्हर’, अजूनही लोकांना काही ना काही देतोच!
8
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
9
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
10
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
11
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
12
लेख: ‘द ग्लिनर्स’- इतक्या साध्या चित्रात खास असं नेमकं काय आहे?
13
विशेष लेख: ‘फॅशन’ उद्योजक खऱ्या कलाकारांची ‘किंमत’ करतात का?
14
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
15
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
16
भगवान महावीरांची १०८ फूट उंच मूर्ती पाटण्यात उभारणार  
17
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
18
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
19
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
20
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
Daily Top 2Weekly Top 5

सहलीतून विद्यार्थ्यांच्या ज्ञानकक्षा रूंदावल्या

By admin | Updated: June 4, 2015 01:37 IST

महाराष्ट्र पोलिसांच्या ‘आपला महाराष्ट्र’ या सुवर्ण जयंती सहल योजनेच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागातील ...

पोलीस विभागाचा उपक्रम : विविध स्थळांना भेटी देऊन घेतली माहिती
गडचिरोली : महाराष्ट्र पोलिसांच्या ‘आपला महाराष्ट्र’ या सुवर्ण जयंती सहल योजनेच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना महाराष्ट्र दर्शन घडले. या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर आदींसह इतर महत्त्वाच्या शहरांना भेटी देऊन तेथील महत्त्वाच्या वास्तू पाहिल्या. यातून नक्षलग्रस्त भागातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रूंदावल्या असल्याचे दिसून येते.
आपला महाराष्ट्र सहलीच्या शेवटच्या टप्प्यात गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागातील आदिवासी विद्यार्थ्यांनी नागपूर शहरातील विविध स्थळांना भेटी देऊन शैक्षणिक, औद्योगिक विकासाची माहिती जाणून घेतली. महाराष्ट्र पोलीस विभागातर्फे सुरू असलेल्या या सहलीच्या उपक्रमाचा हा नववा टप्पा होता. नवव्या टप्प्यातील सहलीत जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागातील ४१ मुली व ३६ मुले असे एकूण ७७ विद्यार्थी सहभागी झाले होते. गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात २३ मे २०१५ रोजी सदर सहल गडचिरोली येथून रवाना करण्यात आली होती.
नागपूर सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी शहरातील दीक्षाभूमी, बुट्टीबोरी येथील आईस्क्रीम फॅक्टरी, अंबाझरी उद्यान व क्रेझी कॅसल वॉटर पार्क आदी स्थळांना भेटी देऊन त्याची माहिती जाणून घेतली. त्यापूर्वी सहलीतील विद्यार्थ्यांनी मुंबई येथील विधानसभवन, मंत्रालय, पोलीस महासंचालक कार्यालय, पोलीस आयुक्त कार्यालय, बांद्रा, जहु चौपाटी, गेट वे आॅफ इंडिया, ताज हॉटेल, एलिफंटा केव्हस, गिरगाव चौपाटी आदी स्थळांना भेटी देऊन माहिती जाणून घेतली. त्यानंतर सहलीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी पुणे येथील हिंजवडी, आगाखान पॅलेस, पुणे विद्यापीठ, भांडारकर संस्था, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, शनिवारवाडा, लाल महाल, सिंहगड किल्ला, खडकवासला धरण, कात्रज सर्पोद्यान, सारसबाग आदी ठिकाणी भेटी दिल्या. तसेच औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, अजिंठा वेरूळ लेणी आदी ठिकाणी भेटी देऊन तेथील सौंदर्य न्याहाळले.
नागपूर येथील सहलीच्या यशस्वीतेसाठी नक्षल विरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक तथा सहपोलीस आयुक्त राजवर्धन तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात अपारंपरिक अभियान प्रशिक्षण केंद्राचे उपप्राचार्य महेश चव्हाण, नक्षल विरोधी अभियानाचे पोलीस निरीक्षक मनोज यादव, गडचिरोलीच्या पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज बहुरे, अशोक रूपनारायण, पोलीस उपनिरीक्षक संजय खंडारे, यशोदा कणसे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (स्थानिक प्रतिनिधी)