उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कोविड योद्ध्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:27 IST2021-06-02T04:27:20+5:302021-06-02T04:27:20+5:30

याप्रसंगी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. धुर्वे, डॉ. मडावी, डॉ. परसवाणी, डॉ. जगदीश बोरकर, डॉ. प्रीतम पेशेट्टीवार, तसेच धानोरा, गडचिरोली, ...

A tribute to the Kovid warriors for their outstanding work | उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कोविड योद्ध्यांचा सत्कार

उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कोविड योद्ध्यांचा सत्कार

याप्रसंगी निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. धुर्वे, डॉ. मडावी, डॉ. परसवाणी, डॉ. जगदीश बोरकर, डॉ. प्रीतम पेशेट्टीवार, तसेच धानोरा, गडचिरोली, कुरखेडा, अहेरी येथील तालुका आरोग्य अधिकारी, जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिपरिचारिका, नर्स, जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, रुग्णवाहिका / शववाहिका चालक, नगर परिषदेतील स्वर्गरथ चालक व अन्य कर्मचारी यांना खासदार अशोक नेते व अन्य प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

यावेळी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, आदिवासी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, अनिल पोहनकर, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, न. प. उपाध्यक्ष अनिल कुणघाडकर, भाजयुमोचे जिल्हा महामंत्री संजय बारापात्रे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. धुर्वे, महिला आघाडीच्या अध्यक्ष दुर्गाताई काटवे, आदिवासी मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष वर्षा शेडमाके, शहर महिला आघाडीच्या नीलिमा राऊत, शहर महामंत्री कविताताई बारसागडे, रोशनीताई बानमारे, शहर महामंत्री विनोद देवोजवार, झोपडपट्टी आघाडीचे श्यामजी वाढई, राकेश राचमलवार, राजुभाऊ शेरकी व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: A tribute to the Kovid warriors for their outstanding work