वडधा-देशपूर मार्गावरील प्रवास खडतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 06:00 IST2019-12-28T06:00:00+5:302019-12-28T06:00:22+5:30

पुलावर खड्डे पडले असून लोखंडी सलाखी बाहेर निघाल्या आहेत. त्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने रस्ता व पुलाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी देशपूर, कुरंजा, देवीपूर आदी गावातील नागरिकांनी केली आहे. सदर मार्गावर दोन ते तीन वर्षांपूर्वी पुलाचे काम मंजूर करण्यात आले. मात्र हे काम अद्यापही हाती घेण्यात आले नाही.

Travel on Vaddha-Deshpur route is tough | वडधा-देशपूर मार्गावरील प्रवास खडतर

वडधा-देशपूर मार्गावरील प्रवास खडतर

ठळक मुद्देदुरूस्तीकडे दुर्लक्ष : मंजूर पुलाचे काम सुरू होण्याची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
वडधा : आरमोरी तालुक्यातील वडधा-देशपूर या मार्गाची दुरवस्था झाली असून पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे सदर मार्गावरील प्रवास खडतर व धोकादायक बनला आहे.
पुलावर खड्डे पडले असून लोखंडी सलाखी बाहेर निघाल्या आहेत. त्यामुळे येथे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने रस्ता व पुलाचे काम पूर्ण करावे, अशी मागणी देशपूर, कुरंजा, देवीपूर आदी गावातील नागरिकांनी केली आहे. सदर मार्गावर दोन ते तीन वर्षांपूर्वी पुलाचे काम मंजूर करण्यात आले. मात्र हे काम अद्यापही हाती घेण्यात आले नाही. पावसाळ्यात हलकासाही पाऊस झाला तरी जुन्या पुलावरून पाणी वाहते. परिणामी देशपूर, कुरंजा, देवीपूर या गावाचा वडधा गावासोबतचा संपर्क तुटतो. वडधा हे गाव या परिसरातील मध्यवर्ती ठिकाणी असून येथे शाळा, महाविद्यालय, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच राष्ट्रीयकृत बँकेची शाखा आहे. तसेच इतर छोटमोठे कार्यालय आहेत. त्यामुळे देशपूर, कुरंजा, देवीपूर व इतर गावातील नागरिक वडधा येथे दररोज कामानिमित्त ये-जा करीत असतात. वडधा येथे बाजारपेठ आहे. त्यामुळे जीवनापयोगी तसेच संसारपयोगी वस्तूंची खरेदी करण्यासाठी अनेक महिला व पुरूष वडधा येथे जात असतात. मात्र रस्ता व पुलाची दुर्दशा झाल्याने धोकादायक प्रवास करावा लागत आहे. या मार्गावर वाहने सुद्धा भंगार झाली आहेत.

Web Title: Travel on Vaddha-Deshpur route is tough