शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेगाड्या सुसाट पण ज्येष्ठांची सवलत जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2022 05:00 IST

दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या पहिल्या लाटेत रेल्वेची प्रवासी वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर हळूहळू रेल्वेसेवा बहाल करण्यात आल्या. गतवर्षी डिसेंबरमध्ये रेल्वेगाड्यांचा विशेष दर्जाही काढण्यात येऊन त्या नियमित गाड्या म्हणून धावू लागल्या आहेत. तथापि, आरक्षित तिकिटांवर प्रवास करण्याची अट मात्र अजूनही लागूच आहे. खिडक्यांवरील तिकीट विक्री अद्यापही सुरू झालेली नाही. याशिवाय कोरोनाकाळापूर्वी रेल्वेच्या प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात मिळणारी सवलत अद्याप बंदच आहे. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : कोरोना संसर्गाची तिसरी लाटही ओसरत आहे. रेल्वेची प्रवासी वाहतूक आता पूर्णपणे सुरळीत झाली आहे. कोरोना काळात धावणाऱ्या गाड्यांचा विशेष दर्जा काढून त्या नियमित झाल्या असल्या तरी कोरोनाकाळापूर्वी रेल्वेत ज्येष्ठ नागरिकांना तिकिटावर मिळणारी ३० टक्क्यांची सवलत अजूनही बंद आहे.  त्यामुळे अनेकांच्या खिशाला झळ बसत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठीची सवलत पुन्हा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.दोन वर्षांपूर्वी कोरोनाच्या पहिल्या लाटेत रेल्वेची प्रवासी वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर हळूहळू रेल्वेसेवा बहाल करण्यात आल्या. गतवर्षी डिसेंबरमध्ये रेल्वेगाड्यांचा विशेष दर्जाही काढण्यात येऊन त्या नियमित गाड्या म्हणून धावू लागल्या आहेत. तथापि, आरक्षित तिकिटांवर प्रवास करण्याची अट मात्र अजूनही लागूच आहे. खिडक्यांवरील तिकीट विक्री अद्यापही सुरू झालेली नाही. याशिवाय कोरोनाकाळापूर्वी रेल्वेच्या प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात मिळणारी सवलत अद्याप बंदच आहे. 

किती मिळते सवलत?-    रेल्वेच्या प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना मूळ भाड्याच्या तीस टक्के सवलत देण्यात येते. ही सवलत सर्वच प्रकारच्या श्रेणींमध्ये लागू आहे.-    एखाद्या गाडीत प्रवास करण्यासाठी प्रवाशाला १०० रुपये तिकीट असेल तर ज्येष्ठ नागरिकांना केवळ ७० रुपये तिकीट मोजावे लागते.

विशेष रेल्वेचा दर्जा काढला, तरी सवलत बंदच

कोरोना काळात ठप्प असलेल्या रेल्वेगाड्या पुन्हा सुरू केल्यानंतर त्या गाड्या काही महिने विशेष दर्जा म्हणून चालविण्यात आल्या. या गाड्यांच्या क्रमांकापूर्वी शून्य लावण्यात आला होता. आता क्रमांकापूर्वीचा शून्य काढून या गाड्या नियमित म्हणून सुरू करण्यात आल्या आहेत. तथापि, रेल्वेत पूर्वी मिळणाऱ्या बहुतांश सवलती बंद आहेत. याकडे रेल्वेने लक्ष देण्याची गरज आहे. 

ज्येष्ठांना फटका 

काेराेना लाटेचा फटका ज्येष्ठ नागरिकांनाही बसला. काेराेना कालावधीत शासनाने सामान्य नागरिकांसाठी अनेक याेजना सुरू केल्या. मात्र, ज्येष्ठांसाठी रेल्वेत असलेली ३० टक्के तिकीट सवलत बंद केली. हा ज्येष्ठ नागरिकांवर अन्याय आहे. आता काेराेनाची लाट ओसरत चालली तरी तिकीट सवलत बंदच आहे. - मधुकर मानकर, ज्येष्ठ नागरिक

ज्येष्ठ नागरिकांचे देशाच्या विकासात फार माेठे याेगदान आहे. त्यामुळे त्यांना सुविधा देणे आवश्यक आहे. मात्र, शासन याकडे लक्ष देत नाही. ३० टक्के प्रवास सवलत लवकरात लवकर सुरू करण्याची गरज आहे. - तुकाराम शेंडे, ज्येष्ठ नागरिक

 

टॅग्स :railwayरेल्वे