शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भवाद्यांचे सेवाग्राम येथे रेलरोको

By admin | Updated: March 8, 2017 02:10 IST

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने ६ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता वर्धा येथील...

६ एप्रिल रोजी आंदोलन : पत्रकार परिषदेत राम नेवलेंनी दिली माहिती गडचिरोली : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने ६ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता वर्धा येथील सेवाग्राम रेल्वेस्थानकावर रेलरोको आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनात विदर्भवादी नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य निमंत्रक राम नेवले यांनी पत्रकार परिषदेतून केले आहे. भाजप सरकारने निवडणुकीपूर्वी वेगळा विदर्भ राज्य देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर सदर आश्वासन पाळत नसल्याचे दिसून येत आहे. विदर्भासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पुढाकाराने ९ आॅगस्ट २०१६, ५ डिसेंबर २०१६ व ११ जानेवारी रोजी आंदोलन करण्यात आले. मात्र भाजप सरकार आता मुके, बहिरे व आंधळे असल्याने त्यांना या आंदोलनाची दखल घेता आली नाही. झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी ६ एप्रिल रोजी सेवाग्राम येथे रेलेरोको आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनादरम्यान दिल्ली, मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या थांबविल्या जाणार आहेत, अशी माहिती राम नेवले यांनी पत्रकार परिषदेतून दिली. पत्रकार परिषदेला विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हा समन्वयक अरूण मुनघाटे, समय्या पसुला, राजेंद्रसिंह ठाकूर, रमेश भुरसे, शालिक नाकाडे, जगदिश बेंद्रे, प्रतिभा चौधरी, अमिता मडावी, संगीता गडपायले, घिसू खुणे, नामदेव लांडगे, गोपाल रायपुरे आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी) यवतमाळ व मेहकर येथे शेतकरी मेळावे सतत वाढत जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा चिंतेचा विषय झाला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे खरे कारण काय, त्यासाठी जबाबदार कोण याच अभ्यास करून उपाययोजना करण्यासाठी शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे. १९ मार्च रोजी यवतमाळ येथील ज्योती मंगल कार्यालयात तर २४ मार्च रोजी बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे.