शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

२५ गावांच्या रहदारीची समस्या सुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 05:01 IST

दोन वर्षांपूर्वी पुलाच्या बांधकामाला शासनाने परवानगी दिली. त्यासाठी ४ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. मागील वर्षीपासून कंत्राटदाराने कामाला सुरूवात केली होती. वर्षभरात पुलाचे काम अतिशय वेगाने केल्याने सदर काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. पिलर पुलाच्या स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे. कठडे निर्माण करण्याचे काम शिल्लक आहे. तसेच पुलाला जोडणारे जोड रस्त्यांचेही काम शिल्लक आहे.

ठळक मुद्देवाहनांची ये-जा सुरू : किष्टापूर नाल्यावरील पुलाचे काम अंतिम टप्प्यात

लोकमत न्यूज नेटवर्कजिमलगट्टा : किष्टापूर नाल्यावरील पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. पावसाळ्यादरम्यान वाहतूक व्हावी, यासाठी सदर पूल रहदारीस मोकळा करून देण्यात आला आहे. त्यामुळे किष्टापूर परिसरातील २५ गावातील नागरिकांसाठी सोयीचे झाले आहे.किष्टापूर नाल्याच्या पलिकडे २५ गावे आहेत. या सर्व गावांना किष्टापूर नाला ओलांडूनच जिमलगट्टा किंवा अहेरी तालुकास्थळ गाठावे लागत होते. अनेक नागरिक पावसाळ्यात जीव धोक्यात घालून नाला भरलेला असतानाही प्रवास करीत होते. त्यामुळे जीवितास धोका होता. तसेच आजारी पडलेल्या व्यक्तीला दवाखाण्यात भरती करण्यासही अडचण निर्माण होत होती. २५ गावातील व्यवहार पावसाळ्यादरम्यान जवळपास ठप्पच पडत होते. नाल्यावर पुलाची निर्मिती करण्याची मागणी अतिशय जुनी असली तरी शासन त्याकडे लक्ष देत नव्हते.दोन वर्षांपूर्वी पुलाच्या बांधकामाला शासनाने परवानगी दिली. त्यासाठी ४ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. मागील वर्षीपासून कंत्राटदाराने कामाला सुरूवात केली होती. वर्षभरात पुलाचे काम अतिशय वेगाने केल्याने सदर काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. पिलर पुलाच्या स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे. कठडे निर्माण करण्याचे काम शिल्लक आहे. तसेच पुलाला जोडणारे जोड रस्त्यांचेही काम शिल्लक आहे.पावसाळ्यात नाल्याला पाणी राहत असल्याने नागरिकांसाठी अडचणींचे होऊ नये, यासाठी कंत्राटदाराने जोड रस्त्यावर काही प्रमाणात मुरूम टाकला आहे. त्यामुळे चारचाकी किंवा दुचाकी वाहन पूल पार करू शकते. सदर पूल झाल्याने नागरिकांसाठी सोयीचे झाले आहे. 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक