झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प

By Admin | Updated: September 17, 2016 01:46 IST2016-09-17T01:46:15+5:302016-09-17T01:46:15+5:30

अहेरी-सिरोंचा मार्गावरील नंदीगाव-मौसम या दोन गावांच्या मध्यभागी मुख्य रस्त्यावर झाड कोसळल्याने

Traffic jam due to collapsing of trees | झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प

झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प

दीड तास लागला : नंदीगाव-मौसम गावादरम्यानची घटना
जिमलगट्टा : अहेरी-सिरोंचा मार्गावरील नंदीगाव-मौसम या दोन गावांच्या मध्यभागी मुख्य रस्त्यावर झाड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक शुक्रवारी सकाळी ठप्प पडली होती.
नंदीगाव, मौसम परिसरात गुरूवारी दमदार पाऊस झाला. रात्रीसुद्धा पावसाच्या सरी कोसळत होत्या. पहाटेच्या दरम्यान नंदीगाव व मौसम या दोन गावांच्या दरम्यान मोठे झाड कोसळले. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. दुचाकीस्वार दुसऱ्या मार्गाने वाहने काढत असली तरी बस, ट्रक यासारखी मोठी वाहने नेण्यासाठी अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजुला वाहनांची मोठी रांग लागली होती. झाड तसेच पडून राहिल्यास आणखी वाहतुकीस विलंब होण्याची शक्यता असल्याने काही बसचे वाहक, चालक व प्रवाशी यांनी पुढाकार घेतला. गावातून लाकूड कापण्याचे साहित्य आणून लाकूड कापण्यात आले. या कामात गावातील स्थानिक नागरिकांनीसुद्धा सहकार्य केले. मार्गावरील झाड तोडल्यानंतर या मार्गावरची वाहतूक सकाळी ९ वाजता सुरळीत सुरू झाली. यावर्षी सिरोंचा- अहेरी मार्गावर झाडे पडून वाहतूक खोळंबण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. यावर्षी पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असल्याचे बस वाहक व चालकांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Traffic jam due to collapsing of trees