शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पार्किंग अभावी वाहतुकीस अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 05:00 IST

सन २०१५ मध्ये सिरोंचा ग्राम पंचायतीचे नगर पंचायतीमध्ये रूपांतर झाले. सिरोंचा येथे राज्य शासनाच्या वतीने नगर पंचायतीची स्थापना करण्यात आली. मात्र ज्या गतीने विकासाची कामे व्हायला पाहिजे होती तशी गती व बदल शहरात दिसून येत नाही. परिणामी शहराच्या मुख्य मार्गावरील डांबरीकरण अनेक ठिकाणी उखडले असून जागोजागी खड्डे पडले आहेत. सदर मार्गावरून आवागमन करण्यासाठी वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

ठळक मुद्देप्रशासनाच्या वतीने कारवाई नाही : सिरोंचा शहरातील मुख्य मार्ग बनला अरूंद

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : सिरोंचा शहरातील मुख्य मार्गालगत असलेल्या दुकानदारांनी समोरच्या भागात अतिक्रमण केले. शिवाय रस्त्याच्या कडेला चारचाकी व दुचाकी वाहने उभी ठेवली जातात. परिणामी मुख्य मार्ग अरूंद बनला. त्यामुळे या मार्गावर बऱ्याचदा वाहतूक विस्कळीत होत असते.सन २०१५ मध्ये सिरोंचा ग्राम पंचायतीचे नगर पंचायतीमध्ये रूपांतर झाले. सिरोंचा येथे राज्य शासनाच्या वतीने नगर पंचायतीची स्थापना करण्यात आली. मात्र ज्या गतीने विकासाची कामे व्हायला पाहिजे होती तशी गती व बदल शहरात दिसून येत नाही. परिणामी शहराच्या मुख्य मार्गावरील डांबरीकरण अनेक ठिकाणी उखडले असून जागोजागी खड्डे पडले आहेत. सदर मार्गावरून आवागमन करण्यासाठी वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.सिरोंचा शहरात बँक आॅफ इंडिया शाखेच्या समोर पार्र्किंगसाठी जागाच उपलब्ध नसल्याने वाहनधारक आपली वाहने रस्त्यावर तसेच जागा मिळेल त्या ठिकाणी ठेवतात. त्यामुळे मुख्य मार्ग अरूंद बनला आहे. शहराच्या मुख्य मार्गावरच बाजारपेठ असल्याने मोठी अवजड वाहने येथून आवागमन करतात. तसेच या मार्गावर मटन मार्केट आहे. त्यामुळे येथे ग्राहकांची मोठी गर्दी असते. अनेक वाहनधारक आपली दुचाकी वाहने रस्त्यावर उभी करीत असतात. परिणामी रस्ता अरूंद बनत आहे.नगरम चौक ते सिरोंचा शहर तसेच बसस्थानक मार्गसुद्धा अरूंद झाला असून या मार्गाने तेलंगणा, छत्तीसगड राज्यातून येणाºया लहान-मोठ्या वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे सदर मार्गाचे रूंदीकरण व मजबुतीकरण करणे गरजेचे आहे, तशी मागणीही होत आहे. राज्य शासन, प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींनी सिरोंचा शहराच्या विकासासाठी रस्ते, नाली बांधकाम व इतर ठोस कामांचे नियोजन करावे, अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी