शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
3
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
4
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
5
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
6
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
7
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
8
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
9
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
10
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
11
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
12
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
13
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
14
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
15
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
16
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
17
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
18
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
19
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
20
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
Daily Top 2Weekly Top 5

जप्त केलेले तीन ट्रक पसार

By admin | Updated: March 3, 2017 01:06 IST

गोदावरी नदीतून तेलंगणा राज्यात रेतीची अवैध तस्करी करीत असलेली ६९ वाहने पकडण्यात आली होती.

सिरोंचा तहसील कार्यालयातून : प्रशासनात खळबळ; वाहनांचा शोध सुरूसिरोंचा : गोदावरी नदीतून तेलंगणा राज्यात रेतीची अवैध तस्करी करीत असलेली ६९ वाहने पकडण्यात आली होती. यापैकी १६ ट्रक सिरोंचा तहसील कार्यालयाच्या परिसरात ठेवण्यात आली होती. मात्र यापैकी तीन ट्रक १ मार्चच्या रात्री फरार झाली असल्याची घटना उघडकीस आली आहे. महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी राममूर्ती व अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजा यांनी ११ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास धाड टाकून ६९ वाहने पकडली होती. यापैकी २७ ट्रक रेतीने भरले होते. रेतीने भरलेल्या ट्रकपैकी ११ ट्रक सिरोंचा पोलीस स्टेशनच्या आवारात तर १६ ट्रक सिरोंचा तहसील कार्यालयाच्या पटांगणात ठेवण्यात आले होते. या १६ ट्रकपैकी टीएस ०५ यूबी १४५८, टीएस यूबी ३९३७, टीएस ०८ यूई ३४० या क्रमांकाचे तीन ट्रक १ मार्चच्या रात्रीच्या सुमारास रेती तहसीलमध्येच रिचवून पसार झाले आहेत. ट्रक पसार झाल्याची बाब गुरूवारी सकाळी उघडकीस आली. त्यामुळे तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ माजली. कारवाई होईल या भितीने ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचणार नाही, याची खबरदारी तहसील कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून घेण्यात येत होती. फरार झालेल्या वाहनांबाबात सिरोंचाचे तहसीलदार कुमरे यांना विचारणा केली असता, सदर ट्रक बॅटरी खराब झाल्याने ते दुरूस्तीसाठी नेले असल्याचे सांगितले. मात्र दुसऱ्याच क्षणी याबाबत एफआयआर नोंदविला जाईल, अशी माहिती लोकमत प्रतिनिधीला दिली. जप्त करून ठेवलेले ट्रक विनापरवानगीने कसे काय नेण्यात आले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ट्रक गहाळ होण्यामागे सिरोंचा तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. (शहर प्रतिनिधी)