तीन अधिकाऱ्यांचा सत्कार

By Admin | Updated: September 4, 2016 02:01 IST2016-09-04T02:01:57+5:302016-09-04T02:01:57+5:30

आरमोरी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सुटल्याने तसेच विविध मागण्या मंजूर

Three officers felicitate | तीन अधिकाऱ्यांचा सत्कार

तीन अधिकाऱ्यांचा सत्कार

आरमोरीत कार्यक्रम : शिक्षकांच्या विविध मागण्या मंजूर
आरमोरी : आरमोरी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या शिक्षकांच्या प्रलंबित समस्या सुटल्याने तसेच विविध मागण्या मंजूर झाल्याने शिक्षक समितीच्या वतीने गुरूवारी संवर्ग विकास अधिकारी ए. डी. सजनपवार, प्रभारी गटशिक्षणाधिकारी डी. जी. नरोटे, सहायक वित्त लेखाधिकारी महेश कोत्तावार यांचा सत्कार करण्यात आला.
प्राथमिक शिक्षकांचे दोन वर्षांपासून वेळेवर वेतन होत नव्हते. तसेच अनेक समस्या प्रलंबित होत्या. शालेय पोषण आहार अनुदान जमा करणे, एकस्तर लावणे, चटोपाध्याय प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविणे, प्रसूती रजा मंजूर करणे, खासगी परीक्षेला बसण्याची परवानगी देणे आदींचा यात समावेश होता. या सर्व समस्यांचे निराकरण पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी केले तसेच दोन ते तीन महिन्यांपासून शिक्षकांचे वेतन महिन्याच्या पाच तारखेच्या आत होत आहे. त्यामुळे शिक्षक समितीच्या वतीने तीन अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी अखिल श्रीरामवार, सुनीता दाऊवार, प्रभारी कनिष्ठ वित्त लेखाधिकारी विलास सहारे, पठाण, येरमे यांनी सहकार्य केले. सत्कार कार्यक्रमाला जयंत राऊत, मेघराज बुरांडे, जीवन शिवणकर, सुनील चरडुके, गुणवंत हेडाऊ, कैलास टेंभूर्णे, गुलाब मने, विठ्ठल होंडे, संतोष मने, सोमनकर आदी उपस्थित होते.

Web Title: Three officers felicitate