शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

उसाच्या रसातून तीन मुलांना विषबाधा

By admin | Updated: April 2, 2016 01:37 IST

एका महिलेने पोटच्या तीन मुलांना उसाच्या रसातून विष पाजल्याचा आरोप तिच्या पतीने केला आहे. गुरुवारी रात्री विलेपार्ले परिसरात घडलेल्या या घटनेनंतर तिन्ही मुलांना स्थानिक रुग्णालयात

बांधकाम सभापतींचा पाठपुरावा : ३ कोटी ५० लाखांचा निधी प्राप्तगडचिरोली : रस्ते दुरूस्तीसाठी ५०५४ या हेडखाली सार्वजनिक बांधकाम विभागाला मिळणाऱ्या निधीतील काही हिस्सा जिल्हा परिषदेला देण्यात यावा, याबाबतची मागणी जिल्हा परिषदेचे बांधकाम व वित्त सभापती अतुल गण्यारपवार यांनी राज्य शासनाकडे केली होती. त्यानुसार शासनाने जिल्हा परिषदेला निधी वितरणाचा आदेश ३१ मार्च रोजी निर्गमित केला असून ५०५४ या हेडखाली गडचिरोली जिल्हा परिषदेला पहिल्यांदाच ३ कोटी ५० लाख ६४ हजार रूपयांचा निधी मिळाला आहे. जिल्हा परिषदेच्या मार्फतीने जिल्ह्यातील ओडीआर (अदर डिस्ट्रिक रोड) व व्हीआर (व्हिलेज रोड) ची दुरूस्ती तसेच बांधकाम केले जाते. मात्र रस्त्यांच्या तुलनेत जिल्हा परिषदेला अत्यंत कमी निधी प्राप्त होत होता. त्यामुळे ओडीआरचे रस्ते कार्यक्षेत्रात येऊनही त्यांच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यावर मर्यादा येत होत्या. ग्रामविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार बांधकाम विभागाला मिळणाऱ्या एकूण निधीतून काही निधी जिल्हा परिषदेला देण्याची तरतूद आहे. मात्र याची अंमलबजावणी केली जात नव्हती. ५०५४ अंतर्गत प्राप्त झालेल्या निधीतील काही निधी जिल्हा परिषदेला देण्यात यावा, यासाठी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती अतुल गण्यारपवार यांनी आवश्यक ते शासन निर्णय जोडून जिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने सदर प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला. राज्य शासनाने या प्रस्तावाची दखल घेत २०१५-१६ च्या पुनर्विनियोजन निधीमधील ३ कोटी ५० लाख ६४ हजार रूपयांचा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त करून दिला आहे. त्याबाबतचे पत्र जिल्हा परिषदेला ३१ मार्च रोजी प्राप्त झाले आहे. या निधीमुळे जिल्ह्यातील दुर्गम तसेच ग्रामीण भागातील रस्ते विकासाला गती मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (नगर प्रतिनिधी)राज्यातील इतरही जिल्हा परिषदांना होणार फायदा५०५४ अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाला प्राप्त होणाऱ्या निधीपैकी काही निधी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला देण्याची तरतूद असली तरी राज्यभरातील जिल्हा परिषदा याबाबत अनभिज्ञ होत्या. त्यामुळे हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागच आजपर्यंत वापरत होता. मात्र गडचिरोली जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे सभापती अतुल गण्यारपवार व प्रशासकीय यंत्रणेने यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर पहिल्यांदाच हा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. त्यामुळे राज्यभरातील इतरही जिल्हा परिषदा आता या निधीची मागणी राज्य शासनाकडे करणार आहेत.