आलापल्लीतील युवकांनी गोळा केल्या हजारो दारूच्या बॉटल

By Admin | Updated: October 7, 2014 23:34 IST2014-10-07T23:34:33+5:302014-10-07T23:34:33+5:30

तालुक्यतील आलापल्ली येथील एकलव्य लोकसेवा संस्था व अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधक समितीच्या सदस्यांनी सोमवारी आलापल्ली येथे स्वच्छता मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान गावातून

Thousands of bottles of liquor bottles gathered by the youth of Elapali | आलापल्लीतील युवकांनी गोळा केल्या हजारो दारूच्या बॉटल

आलापल्लीतील युवकांनी गोळा केल्या हजारो दारूच्या बॉटल

अहेरी : तालुक्यतील आलापल्ली येथील एकलव्य लोकसेवा संस्था व अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधक समितीच्या सदस्यांनी सोमवारी आलापल्ली येथे स्वच्छता मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान गावातून हजारो दारूच्या रिकाम्या बॉटल गोळा केल्या. या अनोख्या साफसफाई मोहिमेची आलापल्लीवासीयांनी कौतूक केले आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी जयंतीच्या दिवशी स्वच्छ भारत अभियानाची सुरूवात केली. सदर अभियान केवळ एक दिवस न राबविता वर्षभर राबविण्याचे आवाहन केले. या अभियानापासून प्रेरणा घेऊन आलापल्ली येथील एकलव्य लोकसेवा संस्था व अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधक समितीच्या सदस्यांनी आलापल्ली येथे ग्रामसफाई मोहीम राबविली. २० युवक व युवतींनी साफसफाई दरम्यान आलापल्ली गावात अस्थाव्यस्त पडलेल्या देशी व विदेश दारूच्या बॉटल गोळा केल्या. ऐवढचे नाही तर या बॉटलमुळे नालीचे पाणी चोकअप होत होते. नालीच्या दुर्गंधयुक्त पाण्यातून बॉटल काढून सांडपाण्याला मार्ग मोकळा करून दिला. अभियान संघटनेचे अध्यक्ष रामू मादेशी यांच्या मार्गदर्शनात हर्षाली दत्तात्रेय वाढणकर, प्रीती वाढणकर, मंगेश वाढणकर, आदित्य बेझलवार, रोहण दुर्गे, निमसरकार, मोहनीश मादेशी, मनोज मादेशी, शैलेश चौधरी, निखिल दुर्गम, संतोष आकरे, रूपेंद्रसिंग, शाम मादेशी यांनी राबविली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Thousands of bottles of liquor bottles gathered by the youth of Elapali