शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षानिमित्त चारही मार्गावर वाहनांची कसून तपासणी

By admin | Updated: January 1, 2017 01:35 IST

नववर्षानिमित्त गडचिरोली शहरात दारू विक्रीसाठी आणण्याची शक्यता लक्षात घेऊन गडचिरोली शहरातील

गडचिरोली : नववर्षानिमित्त गडचिरोली शहरात दारू विक्रीसाठी आणण्याची शक्यता लक्षात घेऊन गडचिरोली शहरातील चारही मुख्य मार्गावर पोलीस तैनात करून चारचाकी तसेच दुचाकी वाहनांची कडक तपासणी केली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असली तरी छत्तीसगड राज्यातून तसेच गोंदिया, भंडारा जिल्ह्यातून चोरीछुपी मार्गाने दारू आणली जाते. नववर्षानिमित्त ओल्या पार्ट्यांचे आयोजन केले जात असल्याने दारूची मागणी वाढते. त्यामुळे या कालावधीत दारूचा भाव दामदुप्पट होतो. या संधीचा फायदा उचलण्यासाठी दारूविक्रेते शहरात दारूविक्रीस आणतात. हा दरवर्षीचा अनुभव असल्याने पोलिसांनी सायंकाळपासूनच धानोरा, चामोर्शी, आरमोरी व चंद्रपूर मार्गावर स्वतंत्र पथकांच्या माध्यमातून तपासणी सुरू केली. चारचाकी व दुचाकी वाहनांचीही यादरम्यान तपासणी केली जात होती. शहरातील इंदिरा गांधी चौकामध्येही पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे रात्री १० वाजेनंतर चौकातील गर्दी आपोआप कमी झाली. उत्पादन शुल्क विभागासह पोलिसांनीही अवैध दारूविक्रेत्यांच्या विरोधात मागील तीन महिन्यांपासून चांगलीच कंबर कसली आहे. त्यामुळे गडचिरोली शहरात होणारा दारूचा पुरवठा कमी झाला आहे. परिणामी शहरात दारूची टंचाई निर्माण झाली आहे. पोलिसांच्या धास्तीने दारूविक्रेते दारूविक्री करण्यास तयार नाही. पोलीस व उत्पादन शुल्क विभागाने अशा प्रकारच्या कारवायांमध्ये सातत्य ठेवण्याची गरज आहे. (नगर प्रतिनिधी)