शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

शिवगाटाला जाण्यासाठी रस्ता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:16 IST

तालुक्यातील कन्हाळगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या शिवगाटा येथे जाण्यासाठी अद्यापही रस्त्याची निर्मिती करण्यात आली नाही.

ठळक मुद्देहातपंप बंदने पाणी टंचाईचे सावट : ग्रामस्थांना चार किमीची करावी लागते पायपीट

ऑनलाईन लोकमतधानोरा : तालुक्यातील कन्हाळगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या शिवगाटा येथे जाण्यासाठी अद्यापही रस्त्याची निर्मिती करण्यात आली नाही. त्यामुळे गावकºयांना जंगलातून ४ किमीची पायपीट करून गावात पोहोचावे लागते. अन् एकीकडे गावात सिमेंटचे रस्ते मंजूर करण्यात आले असून त्यांचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे गावकºयांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. स्वातंत्र्यानंतरही गावातील नागरिकांना गावात पोहोचण्यासाठी रस्त्याची प्रतीक्षा करावी लागत आहे.धानोरा तालुक्यातील अतिदुर्गम शिवगाटा गावात अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. गावात एकमेव असलेले हातपंप एक महिन्यापासून बंद आहे. गावातील विहिरीच्या पाण्याने तळ गाठले आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावात जाण्यासाठी रस्ताच नाही, ४ किमी जगंलातून पायवाट काढून गावात जावे लागते. गावातील अंतर्गत रस्त्यांवर मात्र सिमेंटचे रस्ते बनविले जात आहेत. एकीकडे लगतच्या गावात जाण्यासाठी रस्ता नाही आणि गावात सिमेंटचे रस्ते बनविले जात आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.लोकप्रतिनिधी, प्रशासनाने याकडे लक्ष देवून अगोदर गावात जाण्यासाठी रस्त्याची निर्मिती करावी, गावातील समस्या सोडवाव्यात, अशी मागणी शिवगाटावासीयांनी केली आहे. शिवगाटा या गावात गेल्या एक महिन्यापासून वीज पुरवठा खंडीत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागत आहे. एकूणच शिवगाटा या गावात विविध समस्या आवासून उभ्या झाल्या आहेत. मात्र या गंभीर समस्यांकडे कन्हाळगाव ग्रामपंचायत प्रशासनाचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. अशीच परिस्थिती धानोरा तालुक्याच्या अतिदुर्गम भागात असलेल्या अनेक गावांचे आहे. शासनाकडून विविध योजनेअंतर्गत लाखो रूपये खर्च होतात. मात्र विकास कागदावर आहे.वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी उदासीनधानोरा तालुका व अहेरी उपविभागाच्या अनेक आदिवासी बहूल दुर्गम गावात रस्ते, शाळा, वीज आदीसह विविध मूलभूत समस्या अद्यापही कायम आहेत. मात्र या समस्याकडे स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनासह पं.स., जि.प. पदाधिकारी, आमदार, खासदार व पालकमंत्र्यांचे दुर्लक्ष होत आहे. वरिष्ठ अधिकारीही गाव विकासाबाबत गंभीर नाही.