शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
2
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
3
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
4
नितीन गडकरींच्या मुलाच्या कंपनीचा शेअर सुसाट! पेट्रोलमध्ये ८५% इथेनॉलच्या घोषणेने बाजारात पूर आला
5
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
6
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
7
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
8
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
9
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
10
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
11
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
12
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
13
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
14
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
15
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
16
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
17
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
18
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
19
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
20
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
Daily Top 2Weekly Top 5

अंबेझरा गावात जाण्यासाठी पक्का रस्ताच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:35 IST

फाेटाे...पक्क्या रस्त्याच्या प्रतीक्षेत असलेले आंबेझरा गाव. व्येंकटापूर : अहेरी तालुक्याच्या अतिदुर्गम भागात वसलेल्या अंबेझरा गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने ...

फाेटाे...पक्क्या रस्त्याच्या प्रतीक्षेत असलेले आंबेझरा गाव.

व्येंकटापूर : अहेरी तालुक्याच्या अतिदुर्गम भागात वसलेल्या अंबेझरा गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने पायवाटेनेच नागरिकांना प्रवास करावा लागताे. येथे मूलभूत साेयी-सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे गावाचा विकास अद्यापही झाला नाही. मात्र, समस्या साेडविण्याकडे दुर्लक्ष हाेत आहे.

अहेरी तालुका मुख्यालयापासून ३५ कि.मी. अंतरावर अंबेझरा हे गाव आहे. आवलमरी ग्रामपंचायतमध्ये या गावाचा समावेश आहे. आवलमरीपासून अंबेझरापर्यंतचे अंतर १२ कि.मी. आहे. चारही बाजूने जंगल व डाेंगरांचा वेढा आहे. गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. रस्त्यांअभावी गावात बैलगाडीशिवाय माेठी वाहने जात नाही. शासन-प्रशासनाचे कायमच दुर्लक्ष या गावाकडे राहिले आहे. गावातील मुख्य व्यवसाय शेती आहे. गावापासून १२ ते १५ कि.मी. अंतरापर्यंत पक्का रस्ता नसल्याने नागरिकांना पावसाळ्यात चिखलातूनच वाट काढावी लागते. त्यामुळे व्यक्ती आजारी पडल्यास व त्याला रुग्णालयात भरती करण्याची वेळ आल्यास खूप अडचणी येतात. शेती व्यवसाय मुख्य असतानाही येथे सिंचनाच्या सुविधांचा अभाव आहे. पावसाच्या पाण्यावरच नागरिकांना शेती करावी लागते. अनेकदा नापिकी व दुष्काळाचा सामना शेेतकऱ्यांना करावा लागताे. याशिवाय येथे आराेग्य उपकेंद्र, अंगणवाडी नाही. केवळ प्राथमिक शाळा आहे. साेयी-सुविधांसाठी लाेकप्रतिनिधी व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बाॅक्स

साैरदिवे नाममात्र, वीजपुरवठ्याची प्रतीक्षा

अंबेझरा गावात अद्यापही वीजपुरवठा झाला नाही. प्रकाशासाठी गावात साैरदिवे लावण्यात आलेले आहेत; परंतु साैरदिवे नाममात्र ठरत आहेत. ते केवळ शाेभेची वस्तू म्हणून उभे आहेत. गावात माेबाईल कव्हरेज पाेहाेचत नसल्याने अनेकांनी खरेदी केलेले माेबाईल केवळ गाणी वाजविण्याच्या कामात येत आहेत. कसेबसे साैरऊर्जेवर नागरिक माेबाईल बॅटऱ्या चार्ज करतात. विशेष म्हणजे, या भागात वाघाचा वावर आहे. त्यामुळे नवीन साैरदिवे लावावे किंवा वीजपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.