शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

बर्ड फ्लूची लागण व भीती नाही, मात्र स्वच्छता व काळजी घेणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:34 IST

गडचिराेली : परभणीसह महाराष्ट्राच्या पाच जिल्ह्यात बर्ड फ्लूने शिरकाव केला आहे. या पार्श्वभूमीवर शासन व प्रशासनही सतर्क झाले असून ...

गडचिराेली : परभणीसह महाराष्ट्राच्या पाच जिल्ह्यात बर्ड फ्लूने शिरकाव केला आहे. या पार्श्वभूमीवर शासन व प्रशासनही सतर्क झाले असून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. गडचिराेली जिल्ह्यात आतापर्यंत कुठेही बर्ड फ्लू आढळला नाही. मात्र पशुसंवर्धन विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

जि.प. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या जिल्हाभरात १७ रॅपिड ॲक्शन टीम तयार करण्यात आल्या आहेत. या चमू बर्ड फ्लूसंदर्भात अतिशय दक्ष आहेत. तीन महिन्यापूर्वी झालेल्या पशुगणनेनुसार गडचिराेली जिल्ह्यात गावठी व घरगुती देशी बर्ड मिळून जवळपास १० लाख १६५ काेंबड्या आहेत. शहरी व ग्रामीण भागातील पशुपालक विदेशी काेंबड्यांचे पालन करीत नाही. मात्र पाेल्ट्री फार्मधारक विदेशी काेंबड्यांचे पालन करून व्यवसाय करतात. जिल्ह्यात कुठेही मृत पक्षी आढळल्यास संबंधितांनी त्याची याेग्य विल्हेवाट लावावी. स्वच्छता बाळगून आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले. पाेल्ट्री फार्मजवळ झाडे नसावीत. कारण परजिल्ह्यातून व राज्यातून विदेशी व इतर प्रकारच्या पक्षी तेथे येऊन देशी काेंबड्यांमध्ये मिसळतात. परिणामी, अशावेळी व्हायरल इन्फेक्शन हाेण्याची शक्यता असते. गडचिराेली जिल्ह्यात बर्ड फ्लू आढळला नसला तरी पशुपालक, पाेल्ट्री फार्मधारक व विभाग सतर्क झाला आहे.

बाॅक्स

पशुसंवर्धन विभागाकडून घेतला जात आहे आढावा

गडचिराेली जिल्ह्यात काेंबड्या, कावळे, पाेपट आदीसह विविध प्रकारच्या पक्ष्यांची संख्या माेठी आहे. वातावरणातील बदलामुळे व्हायरल इन्फेक्शन निर्माण हाेऊन सदर पक्षी अचानक मृत्यूमुखी पडत असतात. बर्ड फ्लूसारखा धाेका जिल्ह्यात निर्माण हाेऊ नये, या उद्देशाने जि.प. पशुसंवर्धन विभागातर्फे परिस्थितीचा नियमित आढावा घेतला जात आहे. पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पशुपालक पाेल्ट्री फार्मधारकांना सतर्क करण्यात आले आहे.

मृत पक्षी आढळल्यास तात्काळ कळवा

बर्ड फ्लूची जिल्ह्यात बाधा नसली तरी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे. व्हायरल विषाणूमुळे काेंबड्या मृत्यूमुखी पडतात. पशुपालकांनी लसी व औषधाेपचार करून घ्यावा. जिल्ह्यात कुठेही मृत पक्षी आढळल्यास नागरिकांनी जि.प.च्या पशुसंवर्धन विभागाला तात्काळ माहिती द्यावी, असे आवाहन जि.प. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

काेट

गडचिराेली जिल्ह्यात कुठेही आतापर्यंत बर्ड फ्लू आढळला नाही तसेच कुठेही शिरकाव झाला नाही. असे असले तरी आमच्या विभागात संपूर्ण काळजी घेतली जात असून, जिल्हाभरात १७ रॅपिड रिॲक्शन टीम तयार केल्या आहेत. पशुपालक व पाेल्ट्री फार्मधारकांनी स्वच्छता बाळगून प्रतिबंधात्मक उपाययाेजना कराव्यात.

- डाॅ. सुरेश कुमरे, पशुसंवर्धन अधिकारी