शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
4
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
5
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
6
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
7
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
8
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
9
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
10
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
11
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
12
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
13
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
14
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
15
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
16
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
17
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
18
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
19
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
20
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
Daily Top 2Weekly Top 5

दोटकुलीत तीन लाख रुपयांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 00:27 IST

तालुका मुख्यालयापासून १४ किमी अंतरावर असलेल्या दोटकुली येथील घनश्याम कवडू पोरटे यांच्या घरातील ३ लाख ४ हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्याने चोरून नेली. सदर घटना सोमवारी रात्री ८ ते ११ वाजताच्या सुमारास घडली. चोरट्याला पोलिसांनी जेरबंद केले आहे.

ठळक मुद्देघराचा मागचा दरवाजा तोडला : एका दिवसात आरोपी जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : तालुका मुख्यालयापासून १४ किमी अंतरावर असलेल्या दोटकुली येथील घनश्याम कवडू पोरटे यांच्या घरातील ३ लाख ४ हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यानेचोरून नेली. सदर घटना सोमवारी रात्री ८ ते ११ वाजताच्या सुमारास घडली. चोरट्याला पोलिसांनी जेरबंद केले आहे.लोमेश उर्फ पुरूषोत्तम ठोबे (२४) रा. दोटकुली असे चोरट्याचे नाव आहे. पोरटे हे फर्निचरचा दुकान टाकणार आहेत. यासाठी त्यांनी ३ लाख ४ हजार रुपये रोकड जमा करून ठेवली होती. १८ फेब्रुवारी रोजी रात्री पोरटे कुटुंब गावातील सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी गेले होते. त्याच रात्री लोमेश ठोबे याने घराचा मागच्या दरवाजाच्या लोखंडी कळ्या तोडून घरात प्रवेश केला. आलमारीचा कब्जा तोडून आलमारीतील ३ लाख ४ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. सांस्कृतिक कार्यक्रम पाहून पोरटे कुटुंब घरी परत आल्यानंतर मागचा दरवाजा व आलमारी तोडून असल्याचे दिसून आले. आलमारीची तपासणी केली असता, रोकड गायब झाली होती. तक्रार चामोर्शी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली. एसडीपीओ विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार प्रकाश तुनकलवार, पीएसआय सुरेश घोडाम, निशा खोब्रागडे, पोलीस हवालदार श्यामराव वडेट्टीवार, राजू उराडे, दुलाल मंडल, ज्ञानेश्वर लाकडे, विनोद कुनघाडकर यांनी तपासाची चक्रे फिरवून एका दिवसातच आरोपीला अटक केली.धानोरात दोन ठिकाणी घरफोडीधानोरा येथील विद्यानगर वार्डातील दोन घरी चोरी झाल्याचे सोमवारी उघडकीस आले आहे. विद्यानगरातील रहिवासी मोतीराम सिध्दु कोडाप हे मुरूमगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आहेत. ते रविवारी गोंदिया जिल्ह्यातील कचारगड येथे सहपरिवार यात्रेकरिता गेले होते. दुसऱ्या दिवशी सोमवारी रात्री १२.३० वाजता घरी परत आले असता, घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी आलमारी तोडून दोन सोन्याचे गोफ, अंगठी, रिंग, मंगळसूत्र व सहा हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ४८ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. विद्यानगर येथीलच रहिवासी विलास गेडाम हे रविवारी धानोरा येथेच नातेवाईकाच्या घरी लग्नकार्यासाठी गेले होते. रात्र झाल्याने नातेवाईकाकडेच थांबले. दुसºया दिवशी घरी गेले असता, दरवाजाचे कुलूप तोडले असल्याचे लक्षात आले. मात्र चोरट्यांना आलमारी फोडता आली नाही. गेडाम यांच्या घरी चोरी झाली नाही. मोतीराम कोडाप यांनी चोरीची तक्रार धानोरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस निरिक्षक रमेश बासनवार करीत आहेत.

टॅग्स :ThiefचोरPoliceपोलिस