शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
5
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
6
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
7
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
8
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
9
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
10
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
11
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
12
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
13
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
14
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
15
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
16
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
17
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
18
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
19
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
20
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील पाणीपातळी ०.३७ मीटरने वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2022 05:00 IST

 बारमाही वाहणाऱ्या नद्यांचा जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे. मात्र उन्हाळ्यात अनेक भागांत पाण्याचा प्रश्न गंभीर होऊन बसतो. विशेषत: दुर्गम व ग्रामीण भागांना याचा सर्वाधिक फटका बसत आलेला आहे. अनेक ठिकाणी ग्रामस्थ पाण्यासाठी भटकंती करीत असतात.  दरम्यान मागील वर्षी पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळल्याने भूगर्भातील पाणीपातळीमध्ये वाढ झाली आहे.  भूजल सर्वेक्षण विभागाने मार्चअखेर जिल्ह्यातील ११२ विहिरींच्या पाणीपातळीचे सर्वेक्षण केले. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात मागील पाच वर्षांच्या तुलनेत या वर्षी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने केलेल्या मार्चअखेरच्या पाणीपातळी तपासणीअंती जिल्ह्याच्या पाणीपातळीत ०.३७  मीटरने वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. असे असले तरी जिल्ह्यातील अनेक भागांत पाण्याची गंभीर समस्या कायम आहे. बारमाही वाहणाऱ्या नद्यांचा जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे. मात्र उन्हाळ्यात अनेक भागांत पाण्याचा प्रश्न गंभीर होऊन बसतो. विशेषत: दुर्गम व ग्रामीण भागांना याचा सर्वाधिक फटका बसत आलेला आहे. अनेक ठिकाणी ग्रामस्थ पाण्यासाठी भटकंती करीत असतात.  दरम्यान मागील वर्षी पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस कोसळल्याने भूगर्भातील पाणीपातळीमध्ये वाढ झाली आहे.  भूजल सर्वेक्षण विभागाने मार्चअखेर जिल्ह्यातील ११२ विहिरींच्या पाणीपातळीचे सर्वेक्षण केले. 

जिल्ह्यातील १५३ हातपंप बंद-    जिल्ह्यात बाराही तालुके मिळून एकूण १० हजार ४८४ हातपंप आहेत. यांतील ५३२ हातपंप आतापर्यंत दुरुस्त करण्यात आले आहेत; तर तब्बल १५३ हातपंप बंद अवस्थेत आहेत. हातपंप बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रातील हातपंप दुरुस्त करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

कुरखेडा, कोरची, देसाईगंजात घट-    भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने जिल्हाभरातील केलेल्या गावातील सार्वजनिक विहिरींच्या तपासणीअंती देसाईगंज, कुरखेडा व देसाईगंज (वडसा) तालुक्यांत मागील पाच वर्षांच्या तुलनेत पाणीपातळीत घट झाल्याचे निदर्शनास येत आहे. देसाईगंज तालुक्यातील पाणीपातळीत ०.२० मीटर घट आढळून आली. कुरखेडा ०.२६, तर कोरची ०.२५ मीटर एवढी घट आढळून आली आहे. यामुळे या तालुक्यातील ग्रामीण भागात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. पाण्याचा याेग्य वापर करण्याची गरज आहे. 

 

टॅग्स :water shortageपाणीकपात