१५ जवानांच्या हत्येचा सूत्रधार,१ कोटी इनाम असलेला जहाल माओवादी प्रशांत बोसचा अखेर अंत

By संजय तिपाले | Updated: April 3, 2026 20:25 IST2026-04-03T20:21:28+5:302026-04-03T20:25:41+5:30

झारखंडमध्ये हाय अलर्ट: पाच वर्षे तुरुंगात, उपचारादरम्यान सोडला श्वास

The mastermind behind the murder of 15 jawans, the fierce Maoist Prashant Bose with a bounty of 1 crore, finally died. | १५ जवानांच्या हत्येचा सूत्रधार,१ कोटी इनाम असलेला जहाल माओवादी प्रशांत बोसचा अखेर अंत

The mastermind behind the murder of 15 jawans, the fierce Maoist Prashant Bose with a bounty of 1 crore, finally died.

गडचिरोली : प्रतिबंधित सीपीआय-माओवादी संघटनेचा सर्वात मोठा रणनीतीकार, पॉलिट ब्युरो सदस्य, १५ जवानांच्या हत्येचा सूत्रधार आणि १ कोटी रुपयांचे बक्षीस असलेला जहाल माओवादी नेता प्रशांत बोस उर्फ किशन दा (८०) याचा ३ एप्रिल रोजी मृत्यू झाला. रांची येथील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये उपचारादरम्यान त्याने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या निधनामुळे माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर झारखंडसह सीमावर्ती भागात सुरक्षा हायअलर्ट जारी केला आहे.
 
प्रशांत बोसची दंडकारण्यात मोठी दहशत होती. महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड, बिहार आणि ओडिशा अशा विविध राज्यांमध्ये झालेल्या २०० हून अधिक हिंसक घटनांमध्ये त्याचा   हात होता.​मूळचा पश्चिम बंगालचा असलेला प्रशांत बोस हा माओवादी संघटनेत महासचिव नंबाला केशव राव यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात शक्तिशाली नेता मानला जायचा. त्यास माओवाद्यांचा 'थिंक टँक' मानले जात असे. जंगलातील गनिमी काव्यापासून ते शहरी नक्षलवादाच्या जाळ्यापर्यंत सर्व महत्त्वाच्या निर्णयांत त्याची महत्त्वाची भूमिका होती.

तो सध्या सरायकेला येथील तुरुंगात न्यायालयीन कोठडीत होता. ३ एप्रिल रोजी पहाटे त्याला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. प्रकृती चिंताजनक झाल्याने सकाळी ६ वाजता कडक पोलिस बंदोबस्तात त्याला रांचीच्या 'रिम्स' रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांच्या पथकाने तातडीने उपचार सुरू केले, मात्र वाढत्या वयोमानामुळे आणि फुफ्फुसांच्या विकारांमुळे उपचारांना प्रतिसाद मिळाला नाही. अखेर सकाळी १० च्या सुमारास डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दिवाळीदिवशी कॅम्पवर हल्ला, १५ जवान झाले होते शहीद 

२०२१ मध्ये दिवाळीच्या दिवशी पोलिस कॅम्पवर झालेल्या हल्ल्याचा कट बोसनेच रचला होता, ज्यात १५ जवान शहीद झाले होते.
​अनेक दशकांपासून सुरक्षा यंत्रणांच्या हातावर तुरी देणाऱ्या प्रशांत बोसला १२ नोव्हेंबर २०२१ रोजी सरायकेला-खरसावा जिल्ह्यातून अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्याच्यासोबत त्याची पत्नी आणि माओवादी नेत्या शीला मरांडी हिलाही बेड्या ठोकल्या होत्या. अटकेच्या वेळी त्याच्यावर १ कोटीचे बक्षीस जाहीर होते. तेव्हापासून तो तुरुंगातच होता.

​सुरक्षा व्यवस्थेत वाढ

​प्रशांत बोसच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरताच पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. माओवादी समर्थकांकडून हिंसक प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता असल्याने नक्षलग्रस्त भागात सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे. रुग्णालयात दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात येत असून, शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाणार आहे.

Web Title : 15 जवानों की हत्या का आरोपी माओवादी प्रशांत बोस की मौत

Web Summary : 1 करोड़ के इनामी माओवादी नेता प्रशांत बोस का रांची में इलाज के दौरान निधन। वह 15 जवानों की हत्या समेत 200 से अधिक हिंसक घटनाओं में शामिल था। प्रभावित क्षेत्रों में सुरक्षा बढ़ाई गई।

Web Title : Maoist Leader Prashant Bose, Wanted in 15 Killings, Dies

Web Summary : Prashant Bose, a top Maoist leader with a bounty of ₹1 crore, died during treatment in Ranchi. He was a key strategist involved in over 200 violent incidents, including the killing of 15 soldiers. Security has been heightened in affected areas.