शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

लग्न समारंभ आटाेपून निघालेल्या वऱ्हाडाचे भरधाव वाहन उलटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2022 05:00 IST

अपघातग्रस्त वाहन जीवनगट्टा येथील आहे. अपघात होताच गाडीचा चालक पळून गेला. बारसेवाडा येथील नागरिकांनी अपघातग्रस्तांना मदत केली. वाहनाच्या खाली अनेकजण दबले होते. गावातील काही युवकांनी वाहनाची ट्राॅली सरळ करून त्याखाली दबलेल्या जखमींना काढले. जखमींपैकी एकाला दुचाकीवर बसवून, तर इतरांना दोन रुग्णवाहिका व एका खासगी वाहनाने ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.

लाेकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : गडचिरोली तालुक्यातील पोटेगाव येथील लग्नसोहळा आटोपून गावाकडे परतणाऱ्या वऱ्हाडाचे पिकअप वाहन उलटून झालेल्या अपघातात २४ जण जखमी झाले. त्यातील  काहीजण वाहनाखाली दबल्या गेल्याने गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात बुधवारी (दि. १) रात्री ९ वाजेच्या सुमारास एटापल्लीपासून १० किलोमीटरवर असलेल्या बारसेवाडा गावाजवळ घडला. प्राप्त माहितीनुसार, एटापल्लीपासून जवळच असलेल्या वासामुंडी येथील नागरिक गडचिरोली तालुक्यातील पोटेगाव येथे लग्नसमारंभासाठी गेले होते. तेथून पिकअप मालवाहू वाहनाने ते परतीच्या प्रवासात होते. दरम्यान, बारसेवाडा गावाजवळ रात्री ९ वाजेच्या सुमारास त्यांचे वाहन उलटले. त्यामुळे २४ जण जखमी झाले. त्यात १३ पुरुष,  दोन महिला, आठ मुली आणि एक १२ वर्षांचा मुलगा आदींचा समावेश होता. 

-    एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात डाॅ. जया धातुरकर व सर्व कर्मचाऱ्यांनी तत्काळ सेवा दिली. सात जणांना रात्री १२ वाजेनंतर अहेरी येथे रेफर करण्यात आले. -    यात दोन महिला व चार मुली, एका युवकाचा समावेश आहे. त्यातील काही जणांची प्रकृती गंभीर आहे.

राजकीय पदाधिकाऱ्यांकडून मदतीचा हात

अपघाताची माहिती होताच काँग्रेससह शिवसेना, भाकप व इतर पक्षांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, पत्रकार यांनी रुग्णालयात येऊन रुग्णांना शक्य ती मदत केली. रुग्णांना आणण्यासाठी वाहने पाठविण्यात आली. अहेरी  ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यासाठी रुग्णांना ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, तोडसा आणि सूरजगड प्रकल्प अशा तीन ठिकाणच्या रुग्णवाहिकांनी सेवा दिली.

चालकाने काढला पळ-    अपघातग्रस्त वाहन जीवनगट्टा येथील आहे. अपघात होताच गाडीचा चालक पळून गेला. बारसेवाडा येथील नागरिकांनी अपघातग्रस्तांना मदत केली. वाहनाच्या खाली अनेकजण दबले होते. गावातील काही युवकांनी वाहनाची ट्राॅली सरळ करून त्याखाली दबलेल्या जखमींना काढले. जखमींपैकी एकाला दुचाकीवर बसवून, तर इतरांना दोन रुग्णवाहिका व एका खासगी वाहनाने ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.

 

टॅग्स :Accidentअपघात