शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कंट्राेल रूममधून राेखणार कृषी निविष्ठांचा काळाबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2022 05:00 IST

शेतकऱ्यांना बियाणांची निवड करताना अडचणी येतात. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीबाबत तक्रारी करता याव्यात, यासाठी जिल्हास्तरावर कंट्राेल रूम स्थापन करण्यात आले आहे. सदर कंट्राेल रूममध्ये राज्यशासनाचा कृषी विभाग व जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. तक्रार नाेंदविल्यानंतर लगेच शेतकऱ्यांच्या समस्येचे निराकरण केले जाणार आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : खरीप हंगामात बियाणे, खते व कीटकनाशकांचा काळाबाजार हाेताे. यात शेतकऱ्यांची फसवणूक हाेते. तसेच शेतकऱ्यांना तक्रारी करण्यासाठी साेयीसुविधा नसते. ही साेय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष (कंट्राेल रूम) स्थापन करण्यात आले आहे. खते, बियाणे व इतर बाबीसंदर्भात काळाबाजार दिसताच थेट नियंत्रण कक्षात तक्रार देता येणार आहे. चालू खरीप हंगामाला काही दिवसांतच सुरूवात हाेणार आहे. बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. अशावेळी शेतकऱ्यांना बियाणांची निवड करताना अडचणी येतात. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणीबाबत तक्रारी करता याव्यात, यासाठी जिल्हास्तरावर कंट्राेल रूम स्थापन करण्यात आले आहे. सदर कंट्राेल रूममध्ये राज्यशासनाचा कृषी विभाग व जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी भ्रमणध्वनी क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. तक्रार नाेंदविल्यानंतर लगेच शेतकऱ्यांच्या समस्येचे निराकरण केले जाणार आहे. कृषी निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिंकिंगबाबत असलेल्या तक्रारींचे निवारण केले जाईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्ताेळी यांनी दिली.

या क्रमांकावर नाेंदवा तक्रार-    कृषी निविष्ठांबाबत असलेल्या तक्रारी कृषी विभागापर्यंत पाेहाेचविण्यासाठी शेतकऱ्यांना ९४०४५३५४८१ या क्रमांकावर संपर्क साधता येईल. हा क्रमांक शेतकऱ्यांना तक्रार नाेंदविण्यासाठी समपात (डेडीकेटेड) करण्यात आला असून सकाळी ८ ते रात्री ८ वाजतापर्यंत शेतकऱ्यांना भ्रमणध्वनीवर तक्रार नाेंदविता येईल. 

शेतकऱ्यांनी काय खबरदारी घ्यावी?

-    खरीप हंगाम सुरू झाल्यानंतर कृषी केंद्रांवर निविष्ठा खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी उसळते. अशावेळी शेतकऱ्यांची फसवणूक हाेण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच कृषी  निविष्ठा खरेदी करावी. बियाणे खरेदी करताना खरेदीची पक्की पावती, लाॅट नंबर, अंतिम मुदत तपासावी. साेबतच ते जपून ठेवावे. अनधिकृत विक्रेत्याकडून बियाणे खरेदी करू नये, असे जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक संजय मेश्राम यांनी कळविले.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती