शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचे अन्नत्याग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 05:00 IST

टीईटी ग्रस्त शिक्षकांचे जानेवारी २०२० पासूनचे रोखलेले वेतन न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून अदा करणे, अपंग समावेशित शिक्षण योजना (माध्यमिक स्तर) अंतर्गत नियुक्त विशेष शिक्षक व परिचारिकांना उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार थकीत व नियमित वेतन अदा करणे तसेच अन्यत्र समायोजन करणे. ८ हजार संगणक शिक्षक-निदेशकांना सेवेत पूर्ववत रुजू करणे, रात्रशाळेला पूर्णवेळ शाळेचा दर्जा देणे आदी मागण्यांचा समावेश होता.

ठळक मुद्देशिक्षक परिषदेचे निवेदन : वेतनविषयक समस्या निकाली काढण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अनुदानास पात्र-घोषित प्राथमिक, माध्यमिक, व उच्च माध्यमिक शाळातील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या वेतनविषयक व अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने गुरूवार ४ जून रोजी एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन केले. आंदोलनानंतर शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्यामार्फत राज्य शासनाला निवेदन पाठविण्यात आले.निवेदनात, अनुदानास पात्र-घोषित प्राथमिक, माध्यमिक, व उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्यावरील शिक्षक व कर्मचाऱ्यांना १ एप्रिल २०१९ पासून २० टक्के वाढीव अनुदान देणे, अघोषित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व नैसर्गिक वाढीच्या वर्गतुकड्यांचे प्रलंबित प्रस्ताव निकाली काढून अनुदानास पात्र घाषित करणे व वेतन अनुदान वितरित करणे, उच्च माध्यमिक शाळांतील २००३ ते २०१९ या कालावधीतील प्रस्तावित नैसर्गिक वाढीच्या पदांना शासन मान्यता प्रदान करून वेतन अनुदान वितरित करणे, टीईटी ग्रस्त शिक्षकांचे जानेवारी २०२० पासूनचे रोखलेले वेतन न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून अदा करणे, अपंग समावेशित शिक्षण योजना (माध्यमिक स्तर) अंतर्गत नियुक्त विशेष शिक्षक व परिचारिकांना उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार थकीत व नियमित वेतन अदा करणे तसेच अन्यत्र समायोजन करणे. ८ हजार संगणक शिक्षक-निदेशकांना सेवेत पूर्ववत रुजू करणे, रात्रशाळेला पूर्णवेळ शाळेचा दर्जा देणे आदी मागण्यांचा समावेश होता. राज्यभरातील आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी शिक्षक परिषदेच्या पदाधिकाºयांनी गुरूवारी एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन करून शासनाला निवेदन पाठविले.प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची मागणी जिल्हाध्यक्ष संतोष सुरावार, कार्यवाह गोपाल मुनघाटे, संतोष जोशी, उपाध्यक्ष मनोज बोमनवार, केवळराम किरणापुरे, श्यामराव सोनुले, जी. एच. रहेजा, देविदास नाकाडे, नरेंद्र जक्कुलवार, शिवदास वाढणकर, मृणाल तुम्पल्लीवार, गणेश तगरे, चंद्रकांत बुरांडे, श्यामराव बंडावार, अशोक इंदुरकर, कल्पना खेडुलकर, पंढरी पोफरे, रवीश गुडेल्लीवार व पदाधिकाºयांनी केली आहे.

टॅग्स :Teacherशिक्षक