शहरं
Join us  
Trending Stories
1
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
2
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
3
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
4
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
5
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
6
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
7
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
8
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
9
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
10
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
11
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
12
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
13
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
14
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
15
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
16
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
17
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
18
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
19
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
20
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
Daily Top 2Weekly Top 5

कोसा उत्पादकांना सुगीचे दिवस

By admin | Updated: November 6, 2016 01:28 IST

सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झाल्याने कोसा उत्पादनासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.

योग्य वातावरण : उत्पादनात होणार वाढवैरागड : सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झाल्याने कोसा उत्पादनासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कोसा उत्पादकांना किमान यावर्षी तरी सुगीचे दिवस येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यापूर्वी दोन हंगाम पार पडले असून या हंगामामध्ये मागील पाच वर्षांच्या तुलनेत अधिक कोस्याचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे कोसा उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा व गोंदिया चार जिल्ह्यांमध्ये कोसाचे उत्पादन घेतले जाते. या शेतीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेकडो नागरिकांना उपजीविकेचे साधन निर्माण होते. कोस्याचा प्रथम हंगाम पावसाळा संपल्यानंतर आॅगस्ट महिन्याच्या चवथ्या आठवड्यात दुसरा हंगाम नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आणि तिसरा हंगाम डिसेंबर, जानेवारी महिन्यात हाती येते. पहिला हंगाम चांगला आला आहे.पुढील तीन हंगाम सुद्धा चांगले येतील, अशी प्रतिक्रिया मेंढोबोडी येथील कोसा उत्पादक शेतकरी विलास गेडाम, पत्रू गेडाम, देवराव गेडाम, बिसन गेडाम, मारोती कांबळे, रेवन मेश्राम, चरण मुंगीकोल्हे, पुंडलिक कांबळे, यशवंत गेडाम यांनी दिली. आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात जे हंगाम काढण्यात आले त्या हंगामात मागील पाच वर्षांच्या तुलनेत अधिक उत्पादन झाले. लाभार्थी योजनेंतर्गत बिजकोष उत्पादकांना १ हजार २०० रूपयात १०० अंडीपुंज सवलतीच्या दरात मिळतात. यात रेशीम मंडळाचा आर्थिक सहभाग आहे, अशी माहिती कोसा उत्पादक शेतकरी सुधाकर बक्षी मेश्राम यांनी दिली. येन व अर्जुन या वृक्षावर अंडीपुंज तयार केली जातात. आरमोरी येथील केंद्रातून टसर रेशीम विकासाकरिता मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. मागील पाच वर्ष विविध कारणामुळे कोस्याचे उत्पादन पाहिजे त्या प्रमाणात होत नव्हते. काही कोसा उत्पादकांना तर तोट्याचा सामना करावा लागत होता. यावर्षी मात्र हंगाम चांगला आहे. (वार्ताहर)