शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

वीज ग्राहकांवर अतिरिक्त बिलाचा ताण

By admin | Updated: October 27, 2014 22:36 IST

वीज वितरण कंपनी वीज देयकांच्या माध्यमातून ग्राहकांची लूट व फसवणूक करीत आहे. ग्राहक वीज बिल मिळाल्यानंतर अधिक चौकशी न करता, बिल भरून मोकळे होतात.

गडचिरोली : वीज वितरण कंपनी वीज देयकांच्या माध्यमातून ग्राहकांची लूट व फसवणूक करीत आहे. ग्राहक वीज बिल मिळाल्यानंतर अधिक चौकशी न करता, बिल भरून मोकळे होतात. याचाच फायदा घेत गाहकांच्या खिशावर डल्ला मारला जात आहे. विविध प्रकारचे कर आकारून ग्राहकांना आर्थिक त्रास दिला जात आहे. महावितरणद्वारे दरमहा वीज आकार देयकात १६ प्रकारचे कर असतात. यात स्थिर आकार, वीज, शुल्क, अंधन समायोजन आकार, वीज विक्री कर व सरासरी देयकाची रक्कम, व्याज इतर आकार, समायोजित रक्कम, व्याजाची थकबाकी, देयकाची निव्वळ रक्कम, पूर्णांक देयक, सुरक्षा ठेव जमा आदींचा समावेश आहे. हे कर निव्वळ ग्राहकांची दिशाभूल करणारे आहेत. बिलात दर्शविलेले वितरण हे सामान्य ग्राहकांना समजण्यापलिकडचे असते. यामुळे ग्राहकांना समजणारे साधे व सरळ देयक का देण्यात येत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ग्राहकांच्या वीज देयकात समायोजित रकमेच्या रकाण्यात लावलेली रक्कम ही ग्राहकाची आर्थिक फसवणूक आहे. वीज वितरण कंपनीला जे आर्थिक नुकसान वा तूट होते, ती देखील ग्राहकांकडून वसूल केली जाते. महावितरणातील गैरप्रकार, विजेची चोरी, तूट यामुळे आर्थिक नुकसान होत असेल तर ती ग्राहकांकडून वसूल करण्याचे प्रयोजन काय, हा महत्वाचा प्रश्न आहे. दरमहा वीज देयकात अंतिम तारीख असते. त्या तारखेपूर्वी देयक अदा केल्यास १०-२० रूपये सुट व अंतिम तारखेपर्यंत रक्कम न भरल्यास १०- २० रूपयांचा दंड सोसावा लागतो. यातील सुट दिलेली रक्कम पुढील देयकात वळती करीत थकबाकी सूचनेत केवळ ३.७० पैसे वा २.१६ पैसे तत्पर सूट दर्शविली जाते.हा प्रकार निव्वळ दिशाभूल करून लूट करणारा आहे. विजेची देयके नेहमीच उशीरा व अंतिम तारखेच्यानंतर दिली जातात. यामुळे ग्राहकांना नाहक भुर्दंड सासावा लागतो. निर्माता कंपनी असो वा वितरण कंपनी, वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावल्यास नुकसान होत नाही. वीज कंपनीचे अधिकारीच गैरप्रकार करीत असल्याने कंपनी तोट्यात येत असल्याचे सर्वश्रुत आहे. ही नुकसान भराई त्यांच्याकडून वसूल करणे सोडून ग्राहकांची पिळवणूक केली जाते. वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हा प्रकार रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्राहकांतून होत आहे. कंपनीच्या कारभारामुळे अनेक ग्राहक त्रस्त आहेत. (शहर प्रतिनिधी)