शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

युवक काँग्रेसतर्फे रस्ता रोखो

By admin | Updated: June 11, 2016 01:21 IST

वाढलेली महागाई व केंद्र शासनाने निवडणुकीदरम्यान सामान्य जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण झाले...

आरमोरी व गडचिरोलीत आंदोलन : महागाई विरोधात दिली निदर्शनेगडचिरोली/आरमोरी : वाढलेली महागाई व केंद्र शासनाने निवडणुकीदरम्यान सामान्य जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण झाले नसल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसतर्फे आरमोरी व गडचिरोली येथे धरणे आंदोलन तसेच रस्ता रोखो आंदोलन शुक्रवारी करण्यात आले. गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात दुपारी १२ वाजताच्या सुमारास काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी केंद्र शासनाच्या विरोधात निदर्शने केली. सातत्याने पेट्रोल, डिझेल, गॅस यांच्या किमतीत सातत्याने वाढ केली जात असल्याने जनता त्रस्त झाली असल्याचा आरोप करीत निदर्शने केली. या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव हरीक्रिष्णा उजाला, महिला जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, हसनअली गिलानी, पंकज गुड्डेवार, सतीश विधाते, काशिनाथ भडके, पांडुरंग घोटेकर, नरेंद्र भरडकर, लता पेदापल्ली, नितेश राठोड, जीवन कुत्तरमारे, पं.स. सदस्या अमिता मडावी, रजनिकांत मोटघरे, अमोल भडांगे यांनी केले.आरमोरी - येथील भगतसिंग चौकात तालुका काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष किशोर वनमाळी, माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर काही काळ रस्ता रोखो सुध्दा करण्यात आला. आंदोलनात आनंदराव आकरे, रामभाऊ हस्तक, बग्गुजी ताडाम, युवक काँग्रेसचे विधानसभा प्रमुख मिलिंद खोब्रागडे, पं.स. सदस्य इंदिरा मोहुले, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष मंगला कोवे, वघाळाच्या सरपंचा मनिषा दोनाडकर, श्रीनिवास आंबटवार, दत्तू सोमनकर, दिलीप घोडाम, नामदेव सोरते, प्रभाकर टेंभुणे, चंदू वडपल्लीवार, नरेश टेंभुर्णे, भुपेश कोलते, सुभाष सपाटे, अनिल सोमनकर, जितेंद्र रामटेते, यज्ञकला ठवरे, बेबी सोरते, देविदास उंदीरवाडे, वृंदा गजभिये, विलास हारगुळे, दीपक दुपारे, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)